शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

बीडमध्ये इंटरनेट लाईन तोडली; दीड हजार ग्राहक ‘आॅफलाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 12:22 AM

बीड शहरातील सुभाष रोडवर सुरु असलेल्या रस्ता कामामुळे चुकीच्या पद्धतीने खोदकाम केल्यामुळे मेन इंटरनेट लाईन पूर्णत: डॅमेज झाली असून मागील तीन दिवसांपासून दूरध्वनी व इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

ठळक मुद्देबँका, व्यापारी प्रतिष्ठानातील कामे खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील सुभाष रोडवर सुरु असलेल्या रस्ता कामामुळे चुकीच्या पद्धतीने खोदकाम केल्यामुळे मेन इंटरनेट लाईन पूर्णत: डॅमेज झाली असून मागील तीन दिवसांपासून दूरध्वनी व इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे बीएसएनएलचा महसूल तर बुडाला परंतू दीड हजार ग्राहकांना आणि बॅँकांना याचा मोठा फटका बसला आहे.

शहरातील अण्णाभाऊ साठे चौक ते सुभाष रोड आणि बशिरगंज ते भाजीमंडई, सुभाष रोडपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम सुरु आहे. आधी गटारींचे काम व नंतर रस्त्याचे काम होत आहे. सुभाष रोड येथून भाजीमंडई व स्टेडियमकडे जाणाºया दोन्ही वळणावर गटारींचे स्लॅब टाकण्याचे काम सुरु आहे. या ठिकाणी कोणताही विचार न करता पोकलेनने रस्ता फोडल्याने बीएसएनएलची इंटरनेट मेन लाईन पूर्णपणे ध्वस्त झाली.त्यामुळे ६ जानेवारी रोजी दुपारी चारवाजेपासून इंटरनेट सेवा बंद पडली व दूरध्वनी यंत्रणा कोलमडली. विशेष म्हणजे एका ठिकाणी हे केबल तुटल्याचे लक्षात आल्यानंतर स्टेडियमकडे जाणा-या वळणावरही हे केबल तोडण्यात आले. परिणामी या सेवा वापरणाºया ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

शनिवारी हे केबल तुटले. त्यामुळे सोमवारपासून केबल शोधण्याचे काम सुरु होते. हे काम अत्यंत जिकीरीचे व अवघड असल्याचे संबंधितांनी सांगितले. त्यामुळे मोठे केबल टाकून सुरळीत सेवेला किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. पुढील रस्ता कामाच्या वेळी दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.बीडमध्ये अशी जाते इंटरनेट मेनलाईनबशिरगंजमधील टेलिफोन एक्सचेंजपासून ही मेनलाईन आहे. हिरालाल चौक, एमआयडीसी, सहयोगनगर, जिजामाता चौक, जालना रोड, आनंदवाडी परिसरापर्यंत, शाहूनगरचे दोन्ही भाग या मेनलाईनला जोडलेले होते. केबल तुटल्याने या परिसरातील जवळपास १५०० ग्राहकांना फटका बसला आहे.

६ जोनवारीपासून इंटरनेट सेवा ठप्पमुळे बॅँका, व्यापारी प्रतिष्ठान, खाजगी सेवादार कंपन्यांची कार्यालये, वर्तमानपत्र कार्यालय, डिजीटल पेमेंट करणारे व घरगुती वापर करणारे ग्राहक तसेच इंटरनेटचा वापर करणा-यांना मोठा फटका बसला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

जी.एम. म्हणाले, खूप वैतागलो !केबल लाईन तुटल्याने बीएसएनएलचे महाप्रबंधक टी. बी. मुंडे यांना विचारणा केली असता आधी थातूरमातूर उत्तर दिले. जबाबदारी लक्षात आणून दिल्यानंतर केबल न. प. ने तोडल्यामुळे ही समस्या असल्याचे ते म्हणाले. सोमवारी २५- ३० फोन आले. खूप वैतागलो, पर्यायी मार्ग काढणे अशक्य असल्याचे ते म्हणाले.