शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
3
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
4
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
5
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
6
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
7
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
8
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
9
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
10
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
12
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
13
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
14
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
15
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
16
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
17
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
18
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
19
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
20
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला

अतिवृष्टीने पीकांचे नुकसान, मात्र पंचनाम्यास विमा कंपनीचा नकार; बीडमध्ये शेतकऱ्यांना फटका

By शिरीष शिंदे | Updated: August 26, 2025 16:16 IST

आमची जबाबदारी केवळ पीक कापणी प्रयोगांचे निरीक्षण करण्यापुरतीच मर्यादित असल्याचे कंपनीचे पत्र

बीड : राज्य सरकारने चालू खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या निकषांमध्ये बदल केल्याचा मोठा आर्थिक फटका बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. जिल्ह्यात १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यात सहभागी होण्यास विमा कंपनीने स्पष्ट नकार दिला आहे. आमची जबाबदारी केवळ पीक कापणी प्रयोगांचे निरीक्षण करण्यापुरतीच मर्यादित असल्याचे पत्र आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने तहसील प्रशासनाला दिले आहे.

विमा कंपनीने फिरवली पाठकाही दिवसांपूर्वी गेवराईच्या तहसीलदारांनी, एनडीआरएफच्या निकषांनुसार होणाऱ्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यात विमा कंपनीने सहभागी व्हावे, यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीला पत्र दिले होते. यावर उत्तर देताना कंपनीने म्हटले आहे की, ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आमची जबाबदारी केवळ पीक कापणी प्रयोगांचे सह-निरीक्षण करण्यासाठी मनुष्यबळ पुरवण्यापुरती आहे. एनडीआरएफच्या द्वारे आयोजित नुकसान मूल्यांकन सर्वेक्षणात आमचा सहभाग योजनेच्या कक्षेबाहेर आहे.’ कंपनीच्या या भूमिकेमुळे ऐन संकटाच्या काळात शेतकऱ्यांना कोणाचा आधार घ्यावा, असा प्रश्न पडला आहे.

निकष का बदलले?२०२२ पासून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केवळ १ रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती, त्याचा विमा हप्ता केंद्र व राज्य सरकार भरत होते. मात्र, बीडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस पीक विमा भरल्याची प्रकरणे समोर आली होती. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने २०२५ च्या खरीप हंगामापासून योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल केले आहेत. मात्र, या बदलांची व्यापक माहिती शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे निकष बदलल्याने आता शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

जिल्ह्यात पावसाने मोठे नुकसानएकीकडे विमा कंपनीने हात वर केले असताना, दुसरीकडे जिल्ह्यात १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने मोठे संकट ओढवले आहे. १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान बीड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. कृषी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे सुरू केले असून ते आता अंतिम टप्प्यात आहेत. पंचनाम्यानंतरच नुकसानीची निश्चित आकडेवारी समोर येणार आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे बाधित गावे ४९ असून नुकसानग्रस्त शेतकरी ३,४०७ आहेत. जिल्ह्यातील नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार २,०४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्याने पुराच्या पाण्यामुळे २ व्यक्तींचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :RainपाऊसCrop Insuranceपीक विमाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीBeedबीड