शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:19 IST

पालकमंत्री आणि प्रशासन यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतरही बीड जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ९४३ शेतक-यांचा विमा प्रस्तावावर निर्णय न घेता त्यांना विमा नाकारल्याप्रकरणी अखेर बजाज अलियांज कंपनीच्या अधिका-यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची फसवणूक : १ लाख ३४ हजार शेतक-यांचा विमा बुडविला; पालकमंत्र्यांनी दिले होते कारवाईचे आदेश

बीड : पालकमंत्री आणि प्रशासन यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतरही बीड जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ९४३ शेतक-यांचा विमा प्रस्तावावर निर्णय न घेता त्यांना विमा नाकारल्याप्रकरणी अखेर बजाज अलियांज कंपनीच्या अधिका-यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ दिवसांपूर्वी बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विमा कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी व अतिरिक्त कृषी उपसंचालक दिलीप जाधव यांच्या फिर्यादीवरून कंपनीच्या वतीने करार करणारे अधिकारी आणि कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीक विम्याच्या संदर्भाने कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे.बीड जिल्ह्यात मागच्या काही वर्षांपासून पीक विम्याचा प्रश्न सातत्याने गंभीर होत आलेला आहे. शेतक-यांचे विमा प्रस्ताव मंजुर करून लाभ देण्यापेक्षा ते नाकारण्याकडे विमा कंपन्यांचा कल अधिक असल्याचे चित्र आहे. त्यातच २०१८ -१९ च्या रब्बी हंगामातील शोतकºयांचा विमा भरपाईचा प्रश्न गंभीर झाला होता.या वर्षात विमा कंपनीने ७ लाख ३ हजार शेतक-यांना ३२४ कोटीची नुकसान भरपाई दिली, मात्र १ कोटी ३४ हजार ९४३ प्रकरणांवर निर्णयच घेतला नाही. या शेतक-यांना विमा भरपाई संदर्भात विविध शेतकरी संघटना, लोकप्रतिनिधी यांनी कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला होता. तसेच प्रशासनाने देखील सातत्याने कंपनीला निर्णय घेण्याबद्दल आदेशीत केले होते.मात्र कंपनीने शेतक-यांच्या प्रस्तावावर निर्णय तर घेतला नाहीच, मात्र अगदी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी दिलेले निर्देश देखील डावलले. विमा धारक शेतक-यांची आणि सरकारची फसवणूक करण्याच्या उद्देशानेच कंपनीने हे कृत्य केल्याचा ठपका ठेवत १७ जानेवारी रोजीच्या आढावा बैठकीत बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सदर कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.त्यानुसार २० जानेवारी रोजी प्रभारी जिल्हाधिका-यांनी कृषी विभागाला पत्र दिले होते. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कंपनीचे अधिकारी आशिष अग्रवाल, जिल्हा प्रतिनिधी रितेश सिंग व मनीष दुपारे यांच्याविरुद्ध फसवणुकीसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या निर्णयाचे शेतकºयांमधून स्वागत होत आहे.

टॅग्स :BeedबीडCrop Insuranceपीक विमाDhananjay Mundeधनंजय मुंडेPoliceपोलिस