शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

माजलगावमध्ये प्रक्रियेऐवजी डम्पिंग ग्राउंडवरील कचरा जाळला; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:35 IST

माजलगाव नगरपालिकेने शहरातील कचरा टाकण्यासाठी केसापुरी येथे डम्पिंग ग्राउंड केले आहे.

- पुरूषोत्तम करवामाजलगाव ( बीड) : शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी या ठिकाणी नगरपालिकेचे डम्पिंग ग्राउंड आहे. मात्र, या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्या ऐवजी दर आठ दिवसाला येथील कचरा जाळला जात आहे. दोन दिवसांपूर्वी घनकचऱ्यास लावलेली आग अजूनही सुरूच आहे. यातून निघणाऱ्या घातक धुरामुळे अनेक गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नगरपालिकेला अनेक वेळा सांगून देखील काहीच उपयोग होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी १५ मे पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

माजलगाव नगरपालिकेने शहरातील कचरा टाकण्यासाठी केसापुरी येथे डम्पिंग ग्राउंड केले आहे. शहरातील कचरा उचलण्यासाठी व स्वच्छतेसाठी महिन्याला पंचवीस लाख रुपये खर्च होतात. येथील कचऱ्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असताना कचरा आठ दिवसाला जाळला जातो. हा कचरा जाळल्यानंतर २-३ दिवस विझत नाही आणि त्याचा धूर वातावरणात मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. त्यामुळे केसापुरी ,सादोळा , भाटवडगाव, केसापुरी कॅम्प, आबुजवाडी आदी गावातील ग्रामस्थांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. अनेक युवक व वृद्ध दम्याच्या त्रासाने त्रस्त झाले आहेत. याबाबत गावातील नागरिकांनी नगरपालिकेला अनेक वेळा  लेखी व तोंडी तक्रार करूनही याचा काहीच फायदा होईना. उलटे त्रस्त ग्रामस्थ नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना भेटले असता असता त्यांनी हुज्जत घालून अरेरावीची भाषा वापरल्याची माहिती आहे. दरम्यान, येथे ओला व सुका कचरा वेगळा न करता एकत्रित जाळला जातो. कुठलीही प्रक्रिया केली जात नाही. पितळ उघडे पडेल म्हणून हा कचरा जाळण्यात येत असल्याचा आरोप केसापुरीचे माजी सरपंच विलास साळवे यांनी केला आहे.

ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातआमच्या गावा लगतच माजलगाव नगरपालिकेचे डम्पिंग ग्राउंड आहे. वाहतूक करतानाच रस्त्यावर अनेक ठिकाणी कचरा पडून दुर्गंधी पसरते. तसेच आठवड्याला कचरा जाळण्यात येत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिकेला अनेक वेळा सांगून देखील हा कचरा या ठिकाणी जाळण्यात येतो. यामुळे आमच्या गावच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यापुढे या ठिकाणी कचरा जाळल्यास  आम्ही गावकरी १५ मे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत.- विलास साळवे , ग्रामपंचायत सदस्य केसापुरी   

माहिती घेऊन सांगतोडम्पिंग ग्राउंड मधील कचऱ्याला आग लागली याबाबत मला कसल्याच प्रकारची माहिती नाही. याबाबत माहिती घेऊन सांगतो.-व्हि.आर.मुंडे , कार्यालयीन अधीक्षक न.प. माजलगाव

टॅग्स :BeedबीडGarbage Disposal Issueकचरा प्रश्न