शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

जाहीर केलेली मानधनवाढ तात्काळ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 12:15 AM

शासकीय कर्मचा-याचे वेतन व भत्ते लागू करण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्यावतीने जिल्हा परिषदेवर शुक्रवारी रोजी भव्य मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका : मदतनीस महासंघाचा बीड जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा; घोषणाबाजीने पं.स. परिसर दणाणला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अंगणवाडी सेविका व मदतनिसांना केंद्र शासनाच्या वतीने जाहीर केलेली मानधनवाढ तत्काळ द्यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायम कर्मचा-याचा दर्जा देण्यात यावा. त्यांना शासकीय कर्मचा-याचे वेतन व भत्ते लागू करण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्यावतीने जिल्हा परिषदेवर शुक्रवारी रोजी भव्य मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील तीन हजार अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान यांना दिले. अंगणवाडी सेविका व मदतनिसांना केंद्र शासनानेगेल्या वर्षी मानधन वाढ जाहीर केली आहे. मात्र तिजोरीत खडकडाट असल्याचे कारण पुढे करत त्यांना मानधनवाढीपासून राज्य शासन वंचित ठेवत आहे. ३० एप्रिल २०१४ च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या, काढून टाकलेल्या अंगणवाडी सेविका मदतनिसांना सेवासमाप्तीनंतरचा एकरकमी लाभ अनेक कर्मचाºयांना देण्यात आलेला नाही. तो त्यांना तात्काळ द्यावा. थकीत इंधन बिल त्वरित देण्यात यावे. कॅश प्रणाली कामकाज न येणा-या अंगणवाडी सेविकांना कामावरुन कमी करण्यात येऊ नये, त्यांना जुन्या पध्दतीने कामकाज करण्याची संधी देण्यात यावी. बँक खात्याशी आधार लिंक न झालेल्या कर्मचाºयांचे चार महिन्यांपासून रखडलेले मानधन तात्काळ द्यावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर हजारोंच्या संख्येने अंगणवाडी कर्मचाºयांनी मोर्चा काढला होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, जिल्हाध्यक्ष कमल बांगर, राज्य संघटक दत्ता देशमुख, जिल्हा संघटक सचिन आंधळे, रजिया दारुवाले यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस उपस्थित होत्या. या मोर्चाची दखल न घेतल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला.

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्रagitationआंदोलन