शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात उसतोड बंद आंदोलन सुरु; उसाला वाढीव भाव मिळवण्यासाठी सर्वपक्षीय निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 17:07 IST

उसाला योग्य भाव द्या या मागणीसाठी गत एक ते दीड महिन्यापासून विविध आंदोलन सुरु आहेत. मात्र, या आंदोलनाला साखर कारखानदार कसल्याही प्रकारची दाद देत नसल्याने शेतकरी संघर्ष समितीने आता थेट फडात जाऊन उसतोडणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेतला. 

ठळक मुद्देतालुक्यातील उसउत्पादक शेतकरी  मागील दीड महिन्यापासून विविध आंदोलने करत आहेत उसाला 2 हजार 600 रुपयांप्रमाणे पहिली उचल देवून 3 हजार 500 रुपये भाव देण्यात यावा अशी शेतक-यांची मागणी आहे

माजलगांव ( बीड ) :  उसाला योग्य भाव द्या या मागणीसाठी गत एक ते दीड महिन्यापासून विविध आंदोलन सुरु आहेत. मात्र, या आंदोलनाला साखर कारखानदार कसल्याही प्रकारची दाद देत नसल्याने शेतकरी संघर्ष समितीने आता थेट फडात जाऊन उसतोडणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेतला. 

तालुक्यातील उसउत्पादक शेतकरी  मागील दीड महिन्यापासून विविध आंदोलने करीत उसाला 2 हजार 600 रुपयांप्रमाणे पहिली उचल देवून 3 हजार 500 रुपये भाव देण्यात यावा अशी मागणी करीत आहेत. मात्र या मागणीला कारखानदार कसलाच प्रतिसाद देत नाहीत. दरम्यानच्या काळात प्रशासनाने दखल घेवून बैठकीतुन हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला मात्र कारखानदार हे 2 हजार रुपयांच्या वर भाव द्यायला कांहीकेल्या तयार नाहीत त्यामुळे हा तिढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शेतकरी  आणि कारखानदार यांच्यातील भावा संदर्भात वादामुळे मागील अनेक दिवसांपासून प्रत्येकवेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. वारंवार मागणी करुन देखील प्रशासन अथवा कारखानदार दखल घेत नाहीत असे पाहुन आता उसउत्पादक शेतक-यांनी उसतोड बंदी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेवून तो लगेचच अंमलात आणण्याचे जाहिर केले. त्यामुळे आगामी काळात उसा अभावी कारखान्यांची गोची होणार हे मात्र नक्की आहे. 

बाजार समिती आवारात बोलावण्यात आलेल्या या बैठकीत भाई गंगाभिषण थावरे, नितीन नाईकनवरे, धम्मानंद साळवे, नारायण गोले, डाॅ. उध्दव नाईकनवरे, बबनराव सोळंके, हनुमान कदम, नारायण होके, राजेंद्र होके, नाना घाटुळ, पापा सोळंके, नुमान चाउस, राजाभाउ शेजुळ, विकास कदम, रामचंद्र डोईजड यांच्यासह विविध सामाजिक राजकिय पदाधिकारी तसेच उसउत्पादक शेतक-यांचा मोठया प्रमाणावर सहभाग होता. 

शुक्रवारी आमदारांच्या घरावर मोर्चा आमदार आर. टी. देशमुख यांनी साखर आयुक्तांकडून उस उत्पादक शेतक-यांना भाव मिळवुन द्यावा या मागणीसाठी शुक्रवारी (दि. ८) त्यांच्या घरावर शेतकरी संघर्ष समितीतर्फे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे भाई थावरे यांनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी