शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

बीड जिल्ह्यात झुंडशाहीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:41 IST

झारखंडमध्ये झुंडशाहीचा बळी ठरलेल्या तबरेज अन्सारी याच्या हत्येच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यात शुक्रवारी बीड, आष्टी, गेवराई, केज, परळी आणि धारूरमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले, तर माजलगाव, अंबाजोगाई, पाटोदा आणि सिरसाळा मोर्चे काढण्यात आले.

ठळक मुद्देतबरेजला न्याय द्या : बीडमध्ये धरणे, अंबाजोगाईत आक्रोश मोर्चा; धारूरमध्ये निवेदन

बीड : झारखंडमध्ये झुंडशाहीचा बळी ठरलेल्या तबरेज अन्सारी याच्या हत्येच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यात शुक्रवारी बीड, आष्टी, गेवराई, केज, परळी आणि धारूरमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले, तर माजलगाव, अंबाजोगाई, पाटोदा आणि सिरसाळा मोर्चे काढण्यात आले.अंबाजोगाईत आक्रोश आंदोलनअंबाजोगाई : अंबाजोगाई व परिसरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने शुक्रवारी दुपारी आक्रोश आंदोलन छेडण्यात आले. तसेच मुस्लीम अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची मागणी करण्यात आली. शहरातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी मोर्चेकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना दिले.तबरेज अन्सारीच्या मारेकºयांना तत्काळ अटक करावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तबरेजच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य द्यावे. त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत झुंडबळीला गांभीयार्ने घेत केंद्र शासनाने तत्काळ सक्षम कायदा तयार करावा. पूर्वी झालेल्या झुंडबळीच्या घटनेतील पीडितांना न्याय द्यावा. अशा खटल्यास विशेष सरकारी वकील देऊन जलदगती न्यायालयात ही प्रकरणे निकाली काढावीत] अशा विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाºयांना देण्यात आले. या आंदोलनात मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.पाटोद्यात धरणे आंदोलनपाटोदा : पाटोदा येथे मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मुस्लिम समाजाच्या नागरिकांसह सर्वधर्मीय नागरिकांनी सहभाग नोंदवला.आंदोलकांचे तहसीलदारांना निवेदनसर्वोच्च न्यायालयाने अशा हत्या रोखण्यासाठी कायदा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सरकारने समिती नेमून वेळकाढूपणा केला आहे.यावेळी आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनास दिले. अन्सारीच्या मारेकºयांवर व त्यांना पाठबळ देणाºया पोलिसांवर कार्यवाही करावी. अन्सारीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात अ‍ॅड. जब्बार पठाण, सय्यद वहाब, सय्यद अब्दुल्ला, शेख जुनेद, सय्यद शाहबाज, सय्यद रियाज, अमीर शेख, शेख इलियास शेख जवाद, सय्यद शाहनवाज, मुन्ना अन्सार, उमर चाऊस, गणेश कवडे, भूषण जाधव आदींसह शेकडो लोकांनी सहभाग नोंदवला.धारूरमध्ये निवेदनधारूर : तबरेज अन्सारीच्या हत्यारांना कठोर शिक्षा करावी, देशात आतापर्यंत जेवढे मॉब लिचिंग प्रकरण झाले त्यात लवकरात लवकर शिक्षा द्यावी या मागणीसाठी धारूर येथील मुस्लिम बांधवांनी तहसीलदारच्या मार्फत राष्ट्रपती, प्रधानमंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सादेक इनामदार, अ‍ॅड. सय्यद साजेद, सय्यद रज्जाक, अफसर पठाण, सादेक बेग, अकरम भाऊ, ताहेरशा, शेख शाहेद, शेख सिद्दीक, मुबीन शेख, अतीक मोमीन, सय्यद फेरोज, लियाकत ताम्बोली, राहील जरगर, ओसमा जरगर, सय्यद मुनीर, सोहेल जरगर,आदिल ताम्बोली, आजीम काजी, सादेक निरखि, जैनुल काझी, शहबाज पठाण, वसिम पठाण, अमजद शा, मोहसिन शा, अरशद पठाण, खिजर पठाण, समीर ताम्बोली, मैहताब पठाण, सय्यद अहमद, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विविध मागण्या : माजलगावात निवेदनतबरेज अन्सारीच्या हत्येच्या निषेधार्थ माजलगाव येथील मजलीस ए उलमा व इतेहाद युवा मंचतर्फे शुक्रवारी आंबेडकर चौक ते उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.मुस्लिम समाजास अ‍ॅट्रासिटी कायदा लागू करावा, झुंडशाहीच्या मारहाणीत बळी गेलेल्यांसाठी सक्षम कायदा करावा, मॉबलिचिंग प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे, वारसांना शासकीय सेवेत घ्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मौलाना महेबूब, मौलाना आयूब, मुफ्ती मुनीवर, मिर्झा अस्लम बेग, शेख इद्रीस पाशा, अखिल पटेल, शेख आसेफ, राजू खुरेशी, शेख आसद, तौफीक शेख आदीने परिश्रम घेतले.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन