शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अपक्ष आमदारांचे पाठबळ भाजपमागे; धनंजय महाडिक यांचा विजय निश्‍चित - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 17:35 IST

काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्याने शिवसैनिकात नाराजी

- अविनाश मुडेगावकरअंबाजोगाई (बीड):  राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भारतीय जनता पार्टी व महाविकास आघाडी यांच्यात जोरदार रस्सिखेच सुरू असली तरी भाजपाचे धनंजय महाडीक हे निश्‍चितच निवडून येतील,असा दावा केंद्रीय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी अंबाजोगाईत आयोजित पत्रकार परिषदेत केला. 

अंबाजोगाई येथे एका कार्यक्रमानिमित्त केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. सध्या महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक गाजत आहे. भारतीय जनता पक्षाच्या धनंजय महाडीक यांना 32 मते भाजपाकडून मिळणार आहेत. तर उर्वरीत दहा मतांची आवश्यकता हितेंद्र ठाकूर व इतर अपक्ष आमदारांकडून पूर्ण होईल. पहिल्या व दुसर्‍या फेरीतील मतांच्या माध्यमातून महाडीक यांचा विजय निश्‍चित असल्याचे सुतोवाच आठवले यांनी केले. 

अपक्ष प्रेमानेच आमच्या सोबत राज्यसभा निवडणुकीत आम्ही घोडेबाजार अथवा मतांची फोडाफोडी करत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र असे काहीही नाही. राज्यातील अपक्ष आमदार प्रेमानेच भाजपाच्या पाठीशी उभे राहतील, अशी स्थिती आहे.

सामान्य शिवसैनिक नाराज महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेला घरोबा सामान्य शिवसैनिकांना आवडलेला नाही. शिवसैनिकांना ही आघाडी मान्य नसल्याने याचा मोठा फटका पुढील सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेला बसणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. 

पुढच्या वेळी ४०० जागा जिंकणार केंद्र सरकारच्या विरोधात कसलाही रोष नाही.गेल्या आठ वर्षात अनेक लोकोपयोगी कामे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने केली आहेत. मोदींच्या विरोधात सर्व जण एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही. पुढच्या निवडणूकीत मोदी सरकार 400 पेक्षा जास्त जागा घेऊन निवडून येईल, असेही मंत्री आठवले यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाBeedबीड