शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

परळीत १५० फुट उंच तिरंग्याचे लोकार्पण; डोंगरावर डौलाने फडकणारा ध्वज ठरतोय लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 12:12 IST

माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते झाले आज लोकार्पण

परळी (बीड) - परळीत १५० फुट उंच तिरंगा ध्वजाचे लोकार्पण आज सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान करण्यात आले. परळी नगर परिषदेच्या माध्यमातून वैद्यनाथ कॉलेजच्या पाठीमागील डोंगरावर हा ध्वज आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने या स्फूर्तीस्थळाचे लोकार्पण माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्त करण्यात आले. 

वैद्यनाथ कॉलेजच्या पाठीमागील डोंगरावर या ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे. ध्वजाची उंची तब्बल १५० फूट आहे. याठिकाणी एलईडी स्पॉट लाईट, जनरेटर, सीसीटीव्ही, सेफ्टी वॉल कंपाउंड तसेच सुशोभीकरण करून सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. या विशाल तिरंगा ध्वजाचे आज सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मराठवाड्यात सर्वात उंच असणारा हा विशाल तिरंगा ध्वज उभारणे आणि सुशोभीकरणासाठी सुमारे ८२ लाख रुपये खर्च झाला आहे. वैद्यनाथ कॉलेजच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या डोंगरावर हा तिरंगा ध्वज डौलाने फडकत असून दूरनही लक्ष वेधून घेत आहे. यामुळे परळीत आणखी एक टुरिस्ट स्पॉट तयार झाला आहे. परळीकर मोठ्या संख्येने लोकार्पणासाठी उपस्थित होते.

हर घर तिरंगा उपक्रम नव्हता तेव्हा आमचा संकल्पदेशात केंद्र सरकारने आझादी का अमृतमहोत्सव उपक्रमसुरु केला आहे. या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन देशभरात होत आहे. हा उपक्रम सुरु होण्याच्या पूर्वी शहरालगतच्या डोंगरावर तिरंगा ध्वजाची उभारणी करावी, असा संकल्प आम्ही केला होता. हे स्वप्न आज पूर्ण झाले. यापुढे परळीत येणारा प्रत्येकजण येथे आल्याशिवाय राहणार नाही.- आ. धनंजय मुंडे, माजी मंत्री

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडे