शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या लढ्यात आपलेच फितूर, पक्षाला नाही तर जातीला बाप माना: मनोज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 14:38 IST

तुम्ही पक्षाला एवढे मानता तर पक्ष आपल्या मागण्या का मान्य करत नाही, जरांगे पाटील यांनी केला सवाल

अंबाजोगाई :- मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे. सगेसोयरेची व्याख्या लागू करावी यासाठी गेल्या सात महिन्यांपासून मराठा समाजासाठी लढा देत आहे. मात्र माझ्या विरोधात आपल्याच जातीचे लोक उठले आहेत. जर तुम्ही पक्षाला एवढे मानता तर पक्ष आपल्या मागण्या का मान्य करत नाही, असा सवाल उपस्थित करून पक्षाला नाही तर जातीला बाप माना असा सल्ला मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

अंबाजोगाईत साधना मंगल कार्यालयात बुधवारी रात्री सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी बैठक आयोजित केली. मात्र उपस्थितांची गर्दी पाहता या बैठकीचे आयोजन जाहिर सभेत झाले. या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आरक्षणाचा विषय एकजुटीने अंतिम टप्प्यात आला आहे. आता मराठ्यांनी माघार घेवू नये. सगेसोयरे व ओबीसीतून आरक्षण याच आपल्या प्रमुख मागण्या आहेत. मराठा समाजाच्या मुला-बाळासाठी माझा लढा सुरू असताना आपलेच लोक माझ्याशी फितूरी करत आहेत. त्यांना समाज त्यांची जागा दाखवून देईल. 

आपल्या भाषणात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. फडणवीस यांनी माझ्या विरूद्ध पोलिस कारवाई सुरू केली आहे. इतरांना वेगळा न्याय व मला वेगळा न्याय दिला जात आहे. माझ्या प्रमाणे फडणवीसांनी उपोषण केल्यास त्यांना वजन कमी करण्यासाठी दुसरा पर्याय लागणार नाही. सलाईन लावायला शिरही सापडणार नाही. यासाठी माझ्या बाजूला उपोषणाला बसा असे म्हणत त्यांनी फडणवीसांनावर कडाडून टिका केली. राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून सभेस प्रारंभ झाला. यावेळी उपस्थित महिलांनी मनोज जरांगे पाटील यांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी सभेच्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू होती.

तर जनताच तुमचा करेक्ट कार्यक्रम करीलमुख्यमंत्री शिंदे साहेब तुम्ही मराठ्यांच्या मनातून उतरलात. जातीसाठी मी लढा देत असताना माझा करेक्ट कार्यक्रम करण्याची भाषा तुम्ही करीत आहात  हा समाज समजदार आहे. योग्य वेळी तोच तुमचा करेक्ट कार्यक्रम करील अशा शब्दात जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर आपली तोफ डागली.

तो पर्यंत पुढार्‍यांनी आमच्या दारात येवू नये-:मी मतदार, सगेसोयरे अध्यादेश जो पर्यंत लागू होत नाही. तोपर्यंत पुढार्‍यांनी आमच्या दारात येवू नये असे पोस्टर्स सभेच्या ठिकाणी प्रत्येकाच्या हातात झळकत होते. या पोस्टर्सचा संदर्भ देत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, पोस्टर्सचा अंबाजोगाई पॅर्टन संपुर्ण राज्यात दिशादर्शक ठरणारा आहे. ते आपल्याला  त्यांच्या दारात येवू देत नाहीत. मग आपण तर कशाला येवू द्यायचे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत हा लढा सुरूच राहिल असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलBeedबीडMaratha Reservationमराठा आरक्षण