शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्याच्या मिरवणुकीत बैलजोड्यांचा मान, मागील ७५ ट्रॅक्टरच्या ताफ्याने वाढवली शान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 18:34 IST

बैलजोड्यांची संख्या कमी झाली असून त्यांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे.

- पुरूषोत्तम करवामाजलगाव (बीड) : तालुक्यातील सादोळा येथे पोळा सणानिमित्त बैलजोड्यांसोबतच ट्रॅक्टरची ही मिरवणूक काढण्यात आली. गावातील ७५ ट्रॅक्टरची मिरवणूक काढत आगळावेगळा पोळा सण साजरा करण्यात आला. या ट्रॅक्टर पोळ्याची परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती. 

महाराष्ट्रात परंपरेनुसार पोळा सण साजरा करण्यात येतो. यानिमित्त दोन दिवस शेतात राब राबणारे बैल यांना काम करू दिले जात नाही. त्यांना आंघोळ घालून, रंग रंगोटी करत विविध साजाने सजवले जाते. परंतु, मागील काही वर्षांपासून विविध मशीनद्वारे शेतीतील कामे होऊ लागले आहेत. यामुळे शेतातील बैल बारदाना कमी होऊ लागला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ७०-८० बैल राहत त्यांच्याकडे पाच ते दहा बैल राहिली आहेत. तर काहींच्या घरी तर बैलजोडी दिसेनासी झाली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात चिखलांचे बैलांवर पोळा साजरा केला जात आहे.

माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे बैलजोड्यांची संख्या कमी झाली असून त्यांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांनी १०५ बैल जोडयासोबतच ट्रॅक्टरची पण मिरवणूक पोळ्यानिमित्त काढली होती. गावातील जवळपास ७५ ट्रॅक्टर यात सामील झाले. डिजेच्या तालावर ही मिरवणूक काढल्याने वेगळाच नजारा गावात दिसून आला. ग्रामस्थांनी उत्साहाने काढलेल्या बैलजोडी आणि  ट्रॅक्टरच्या मिरवणुकीची चर्चा पंचक्रोशीत होत आहे. 

सादोळा शिवारात सात हजार एकर जमीन असून अगोदरच्या काळामध्ये 5-10 एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांकडे एक बैल जोडी होती. सध्या आधुनिकरण झाले व बळीराजाही काळानुसार बदलला. हळूहळू बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतली. यामुळे गावातील सर्व शेतकऱ्यांनी बैलजोडीसोबतच ट्रॅक्टरची मिरवणूक काढण्याचे ठरवले व ही मिरवणूक यशस्वी देखील झाली.- संजय सोळंके , शेतकरी सादोळा 

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagricultureशेती