शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्यांची पैशांची हाव वाढली; पुण्याच्या वैष्णवीनंतर अंबाजोगाईत शुभांगीने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:40 IST

पतीसह पाच जणांवर गुन्हा : सासरच्या लोकांनी तिला त्रास दिल्याने ती कायम चिंतेत असायची. यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले

अंबाजोगाई : पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे हे हुंडाबळीचे प्रकरण ताजे असतानाच अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता येथील शुभांगी संतोष शिंदे (वय २५, रा. गित्ता, ता. अंबाजोगाई) या विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

मोहखेड( तालुका धारूर) येथील शुभांगी रुस्तुम सोळंके हिचा विवाह अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता येथील संतोष शिंदे याच्या सोबत मे २०२२मध्ये झाला. विवाहानंतर एक वर्ष शुभांगीला चांगले नांदवले. मात्र, त्यानंतर सासरच्या मंडळींनी व्यवसाय करण्यासाठी सातत्याने पैशांची मागणी केली. दोन वेळा ५ लाख रुपये दिलेही. तरी सतत पैशांची मागणी होऊ लागली. याच कारणामुळे तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू होता. पैशांच्या मागणीवरून तिला माहेरीही नेऊन सोडले होते. समजून सांगूनही बदल होत नव्हता. पैशांचा तगादा सुरूच राहिला. याला वैतागून गुरुवारी सकाळी शुभांगी हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिस पंचनाम्यानंतर शुभांगीच्या पार्थिवाचे दुपारी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी शुभांगीचा भाऊ प्रदीप सोळुंके (रा. मोहखेड) यांच्या फिर्यादीवरून शुभांगीचा पती संतोष विलास शिंदे, सासरा विलास बंकट शिंदे, सासू-सुमन विलास शिंदे, नणंद -सीमा विलास शिंदे व संदीप काचगुंडे (रा. आसरडोह) यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा तपास बर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार ससाणे करीत आहेत.

१५ दिवसांपूर्वी लग्नाचा वाढदिवस२२ मे २०२२ या दिवशी शुभांगीचा मोठ्या थाटात विवाह लावण्यात आला होता. त्याच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस १५ दिवसांपूर्वीच झाला होता; परंतु या छळामुळे शुभांगीला या दिवसाचा आनंद लुटता आला नाही. सासरच्या लोकांनी तिला त्रास दिल्याने ती कायम चिंतेत असायची. यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Beedबीडdowry probition actहुंडा प्रतिबंधक कायदाCrime Newsगुन्हेगारी