शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

महिला सुरक्षा वाऱ्यावर! दारूड्या पाेलिसांने घरात घुसून धरला महिलेचा हात; ग्रामस्थांनी चोपले

By सोमनाथ खताळ | Updated: August 1, 2023 16:23 IST

सुरक्षा करणारे पोलिसांकडूनच महिलांच्या जीवाला धोका? याप्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

धारूर : धारूर पोलिस ठाण्यातील एका हवालदाराने दारूच्या नशेत तालुक्यातील एका गावातील महिलेचा घरी जावून हात धरला. महिलेने आरडाओरडा करताच ग्रामस्थ जमा झाले. त्यानंतर या दारूड्या पोलिसाला ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. आता या हवालदाराविरोधात धारूर ठाण्या गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू असून रात्री पर्यंत त्याचे निलंबण होण्याचीही शक्यता आहे.

धारूर पोलिस ठाण्यातील एक कर्मचारी सोमवारी रात्री उशिरा दारू पिऊन तालुक्यातील एका गावात गेला. अंधाराचा फायदा घेत एका घरात जावून त्याने महिलेचा हात धरला. यावेळी महिलेने आरडाओरडा केला. त्यामुळे नातेवाईकांसह ग्रामस्थ जमा झाले. त्यानंतर या दारूड्या पोलिसाला सर्वांनीच चोप दिला. तेथून त्याला धारूर पोलिसांच्या स्वाधीन केले. मंगळवारी सकाळीच हे सर्व नातेवाईक गुन्हा दाखलसाठी पोलिस ठाण्यात आले, परंतू धारूर पोलिसांनी प्रकरण मिटवून घेण्यासाठी प्रयत्न केले. परंतू नातेवाईक निर्णयावर ठाम राहिल्याने या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. धारूरचे सहायक पोलिस निरीक्षक विजय आटोळे यांनीही हा कर्मचारी आपल्याच ठाण्यातील असल्याचे सांगितले आहे.

गुन्हा दाखल करण्याचे आदेशधारूर ठाण्यातील कर्मचाऱ्याने दारू पिऊन गैरवर्तन केल्याचे समजले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रात्रीपर्यंत त्याला निलंबीतही केले जाणार आहे.- नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक बीड

ठाणेदार येणार अडचणीतपोलिस कर्मचाऱ्याने दारूच्या नशेत महिलेचा हात धरला. हा प्रकार गंभीर असतानाही पोलिसांकडून गुन्हा दाखल करणे तर सोडाच उलट आक्रमक भूमिका घेणाऱ्या नातेवाईकांवरच रूबाब झाडण्यात आला. एरव्ही गेले की गुन्हा दाखल करून घेणारे पोलिस या प्रकरणात मात्र मिटवून घेण्यासाठी प्रयत्न करत होते, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळेच दुपारपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकारामुळे ठाणेदार विजय आटोळेही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सुषमा अंधारेंनी व्यक्त केला संताप गुन्हा नोंद करणे तर दूरच उलट गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला. याबाबत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे. फेसबुकवर घटनेचा व्हिडिओ शेअर करत एका पोस्ट द्वारे त्यांनी महिला सुरक्षेवर गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला हे. त्या म्हणल्या, '' गृहमंत्री महोदय,  जर नागरिकांच्या रक्षणासाठी असणारे पोलीसच गोरगरीब माय माऊलींच्या घरात घुसून गैरवर्तन करत असतील तर मायबाप सरकार तुम्ही सांगा जनतेने न्याय कुणाकडे मागायचा..?''

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळ