शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

बीडमध्ये कंबरेला ‘घोडा’ लावून चमकोगिरी करणाऱ्यांना लगाम; १८३ जणांचे परवाने रद्द

By सोमनाथ खताळ | Updated: February 3, 2025 12:24 IST

बीडमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई;आणखी १२७ शस्त्र परवाने होणार रद्द

बीड : गुन्हे दाखल असतानाही अनेकांकडे शस्त्र परवाना होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर पोलिसांच्या प्रस्तावावरून जिल्हाधिकाऱ्यांनी आगोदर १०० आणि आता ८३, असे १८३ शस्त्र परवाने रद्द केले आहेत. आणखी १२७ परवाने रद्द होणार आहेत. चमकोगिरी करणाऱ्यांच्या कंबरेचा घोडा काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

जिल्ह्यात १२८१ जणांकडे शस्त्र परवाना होता. यातील काही लोक हे बीडचे रहिवाशी असले तरी पुणे, मुंबईसह इतर शहरांमध्ये वास्तव्यास होते. तसेच, काही लोकांवर गंभीर गुन्हे दाखल असतानाही त्यांना परवाना देण्यात आला होता. याचाच काही जण दुरुपयोग करून सण, उत्सव काळात हवेत गोळीबार करत होते. तसेच, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्यावर गंभीर १५ गुन्हे दाखल असतानाही त्याला शस्त्र परवाना दिला होता. हे सर्व ‘लोकमत’ने आकडेवारीसह मांडले होते. त्यानंतर हाच प्रश्न भाजपचे आ. सुरेश धस यांच्यासह इतर सत्ताधारी, विरोधी आमदारांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला. त्यावरून शस्त्र परवाना रद्दची कारवाई हाती घेण्यात आली आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी २३२, तर ७८ प्रस्ताव हे विद्यमान अधीक्षक नवनीत काँवत यांनी पाठविले आहेत. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडून यावर कारवाया केल्या जात आहेत.

मयत झाल्यानंतरही परवानाजिल्ह्यात ज्यांच्याकडे परवाना आहे, त्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. पोलिस कर्मचारी घरी जाऊन परवानाधारक शस्त्र हाताळण्यास सक्षम आहे का, जीवंत आहे का, याची खात्री करत आहेत. यामध्ये अनेकजण मयत असल्याचे समोर आले आहे. त्यांचा आकडा ११८ असल्याचे सूत्रांनी सांगितले. आता हे सर्व परवाने रद्द केले जात आहेत.

८ जणांनी स्वत:हून केले सरेंडरशस्त्र परवान्यांचा विषय चर्चेत आल्यानंतर ८ जणांनी, तर आपल्याला हा परवाना नको, म्हणून सरेंडर केले आहेत. इतरही काही लोक त्या तयारीत आहेत.

‘लोकमत’चा यशस्वी पाठपुरावाजिल्ह्यात चणे-फुटाण्याप्रमाणे शस्त्र परवाने वाटले होते. याचे पहिले वृत्त ‘लोकमत’ने ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रकाशित केले. ९ डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर या शस्त्रांचा मुद्दा अधिवेशनात गाजला. त्याचा पाठपुरावा ‘लोकमत’ने केला. त्यामुळेच आतापर्यंत १८३ परवाने रद्द झाले असून, आणखी १२७ रद्दच्या प्रक्रियेत आहेत.

अशी आहे आकडेवारीएकूण शस्त्र परवाना १२८१रद्दसाठी पाठविलेले प्रस्ताव ३१०रद्द परवाना - १८३आणखी होणार - १२७

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडBeed policeबीड पोलीस