शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये शाळा, कॉलेजच्या मुलांनीही केली दगडफेक अन् जाळपोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 19:37 IST

बीडमध्ये चार, तर जिल्ह्यात सात अल्पवयीन मुले ताब्यात : आतापर्यंत ११९ आरोपींना अटक

बीड : मराठा आरक्षणासाठी शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी दगडफेक, जाळपोळीमुळे हिंसक वळण मिळाले. यात आतापर्यंत २३ गंभीर गुन्ह्यांसह ५९ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये जिल्हाभरात ११९ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. याच दंगा करणाऱ्यांमध्ये शाळकरी, महाविद्यालयीन मुलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत बीडमध्ये चार, तर जिल्ह्यात सात जणांना ताब्यात घेतले आहे.

बीड शहरात सोमवारी झालेल्या जाळपोळ, दगडफेकीमध्ये जास्त प्रमाणात मुलांचाच समावेश होता. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्येही २५ वर्षे वयाच्या आतील मुलांचाच जास्त समावेश आहे. या मुलांनी आक्रमक होत सोमवारी दगडफेक करून नुकसान केले होते; तसेच माजी मंत्री, आमदारांच्या घरांसह राजकीय नेत्यांची कार्यालये पेटविली होती. यामुळे जिल्हाभरात आतापर्यंत गंभीर स्वरूपाचे २३ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील आरोपींचा पोलिसांनी शोध घेणे सुरू केले आहे. यात काही अल्पवयीन मुलांचाही सहभाग आढळला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी आतापर्यंत चार मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांना बालन्यायालयासमोरही हजर केल्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल गुरले यांनी सांगितले. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

११९ पकडले, आणखी १५० रडारवरपोलिसांनी आतापर्यंत २३ ठिकाणी ३०७ सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत दाखल गुन्ह्यांची संख्या ५९ वर गेली आहे; तसेच यात ११९ जणांना बेड्या ठोकल्या आहेत; तसेच आणखी १५० जणांची ओळख पटली असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू आहे.

अशी आहे आकडेवारीएकूण ५९ गुन्हे - (जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन, जाळपोळ, जिवे मारण्याचा प्रयत्न, हल्ला, दगडफेक, दंगा करणे, घडवून आणणे, रस्ता अडविणे, विनापरवानगी आंदोलन करणे आदी.)गंभीर गुन्हे - २३एकूण अटक आरोपी - ११९सीआरपीसी ६८, ६९ ची नोटीस (तात्पुरते स्थानबद्ध) - ९३३१०७ ची नोटीस (प्रतिबंधात्मक कारवाई) - ३४६सीआरपीसी ४१ ची नोटीस (सात वर्षांच्या आत शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यात पकडून सोडणे) - ७६१४९ ची नोटीस (गुन्हा करू नये म्हणून) - ७६१अल्पवयीन आरोपी - ७

प्रतिबंधात्मक कारवायांवरही भरपोलिसांकडून गुन्ह्यांत सहभाग असणाऱ्यांना तर अटक केलीच जात आहे; परंतु इतर लोकांवरही प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत. आतापर्यंत एक हजारांपेक्षा जास्त लोकांना नोटीस देण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्याकडूनही काही कारवाया केल्या जात आहेत.

माजलगावनंतर बीडमध्ये पथसंचलनसोमवारी माजलगाव आणि बीड शहरातच जास्त तणाव निर्माण झाला होता. यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्ससह इतर पोलिसांचा फौजफाटा घेऊन बुधवारी माजलगावात पथसंचलन करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बीड शहरातही विशेष पथकांना सोबत घेऊन पथसंचलन करण्यात आले.

दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई

जिल्ह्यात आतापर्यंत २३ गंभीरसह एकूण ५९ गुन्हे दाखल झाले आहेत, तसेच ११९ आरोपींना अटक केली असून, आणखी १५० जणांची ओळख पटविली आहे. त्यांनाही अटक केली जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी स्वतंत्र बंदोबस्त असेल. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. तसेच आम्ही दगडफेक, जाळपोळ झालेल्या ठिकाणांची पाहणी केली आहे.- नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक, बीड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडMaratha Reservationमराठा आरक्षण