शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

बीड जिल्ह्यात अपक्षांनी ६ वेळा उधळला गुलाल; यंदा आडसकर, धोंडे, पवार, जगतापांवर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 17:35 IST

माजलगाव, आष्टी, गेवराई आणि बीड मतदार संघातील अपक्ष उमेदवार सध्या प्रचारात आघाडी घेत आहेत.

बीड : जिल्ह्यात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून गुलाल उधळण्याची परंपरा आहे. १९६२ ते आजपर्यंत सहा वेळा अपक्ष उमेदवार हे आमदार झाले आहेत. आता २०२४ च्या विधानसभेतही ८१ अपक्ष उमेदवारा विधानसभा निवडणूक मैदानात आहेत. यामध्ये रमेश आडसकर, भिमराव धोंडे, लक्ष्मण पवार आणि अनिल जगताप हे प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी बनत आहेत. सध्या तरी या सर्व अपक्षांनी प्रमुखांची धाकधुक वाढवली आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणूकीत १३९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये महायुती, महाविकास आघाडी, इतर प्रमुख पक्षांसह ८१ अपक्षांचाही समोवश आहे. २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. प्रत्येकजण आपल्यालाच उमेदवारी मिळाले, असे सांगत होते. परंतू ऐनवेळी डावलल्याने काहींनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, तर काहींनी उमदेवारीसाठी पक्षांतर केले. परंतू तेथेही उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष अर्ज दाखल केला. माजलगाव, आष्टी, गेवराई आणि बीड मतदार संघातील अपक्ष उमेदवार सध्या प्रचारात आघाडी घेत आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची डोकेदुखी बनत आहेत.

कोणत्या मतदार संघातून कोण?गेवराईत भाजपचे दोन वेळा आमदार राहिलेले लक्ष्मण पवार सध्या अपक्ष उमेदवार आहेत. त्यांची अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित आणि ठाकरे गटाचे बदामराव पंडित यांच्याशी लढत आहे. येथे तिसऱ्या आघाडीच्या पुजा मोरेही सक्रीय आहेत. माजलगावात अजित पवार गटाकडून आ.प्रकाश सोळंके, शरद पवार गटाकडून मोहन जगताप हे उभा असून त्यांना रमेश आडसकर या अपक्ष उमेदवाराचे आव्हान असेल. आष्टीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी आ.भिमराव धोंडे अपक्ष मैदानात आहेत. त्यांना भाजपचे सुरेश धस आणि अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे यांचे आव्हान आहे. बीडमध्ये अजित पवार गटाचे डॉ.योगेश क्षीरसागर, शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर, तिसऱ्या आघाडीचे कुंडलिक खांडे यांना अपक्ष उमेदवर अनिल जगताप यांचे आव्हान असणार आहे. सध्या तरी हे चार अपक्ष उमेदवार तुल्यबळ असल्याने प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी ठरत आहेत.

धोंडे, पंडितांना अनुभवयापुर्वी गेवराई मतदार संघातून १९९५ आणि १९९९ साली बदामराव पंडित हे सलग दोन वेळा अपक्ष आमदार झालेले आहेत. तसेच आष्टीतून १९८० साली भिमराव धोंडे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल करून गुलाल उधळला होता. आता पुन्हा एकदा धोंडे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत तर पंडित ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत.

आतापर्यंतचे अपक्ष आमदारगेवराई मतदार संघ : बदामराव पंडित (१९९५, १९९९)माजलगाव मतदार संघ : बाजीराव जगताप (१९९५)आष्टी मतदार संघ : भिमराव धाेंडे (१९८०), साहेबराव दरेकर (१९९५)केज मतदार संघ : भागुजी निवृत्ती सातपुते (१९७८)

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकbeed-acबीडmajalgaon-acमाजलगांवgeorai-acगेवराईashti-acआष्टी