शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

५०० मीटर फरफटत नेलेल्या 'त्या' तरुणाची मृत्यूशी झुंज संपली; १९ दिवसांनंतर प्राणज्योत मालवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 16:22 IST

गरीब कुटुंबावर कोसळली दुःखाची कुऱ्हाड 

-नितीन कांबळेकडा (जि. बीड): आई-वडिलांचा एकुलता एक आधार आणि दोन बहिणींचा लाडका भाऊ असलेल्या २० वर्षीय आदित्य शहाजी पानखडे याची मृत्यूशी सुरू असलेली १९ दिवसांची झुंज अखेर अपयशी ठरली. २८ डिसेंबर रोजी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या आदित्यचा गुरुवारी पहाटे अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

अपघाताचा 'तो' भीषण थरार २८ डिसेंबर रोजी दुपारी आदित्य पानखडे आपली दुचाकी घेऊन कडा येथील आठवडी बाजारासाठी जात होता. यावेळी कड्याकडून धामणगावकडे जाणाऱ्या एका भरधाव चारचाकी वाहनाने (क्र. MH 23, BC 3737) आदित्यच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, चारचाकीने आदित्यच्या दुचाकीला सुमारे ५०० मीटर अंतरापर्यंत ओढत नेले. या भीषण अपघातात आदित्यच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर इजा झाली होती.

गरीब कुटुंबावर कोसळली दुःखाची कुऱ्हाड अपघातानंतर आदित्यला तातडीने अहिल्यानगर (अहमदनगर) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या पानखडे कुटुंबाने आदित्यला वाचवण्यासाठी जीवाचे रान केले. मात्र, गेल्या १९ दिवसांपासून आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देणाऱ्या आदित्यने गुरुवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. आदित्य हा घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. तरुण मुलाच्या अशा जाण्याने देवीनिमगावमधील प्रत्येक डोळा आज पाणावला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Youth dragged 500 meters dies after 19-day fight for life.

Web Summary : Aditya P., 20, died after a horrific accident on December 28th. A speeding car hit his bike, dragging him 500 meters. Despite treatment, he succumbed to his injuries, leaving his family devastated.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड