शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत गावठी पिस्तूल बाळगणार्‍या युवकास पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 19:10 IST

यशवंतराव चव्हाण चौक परिसरात पोलिसांची कारवाई

अंबाजोगाई (बीड) : कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असणार्‍या युवकाला स्थानिक गुन्हे शाखा बीडच्या पोलिस पथकाने पकडून गजाआड केले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी यशवंतराव चव्हाण चौक परिसरात उघडकिस आला. 

अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण चौक परिसरात अमित उर्फ सोन्या सुंदर गायकवाड, रा. सदर बाजार. हा युवक कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील पोलिस हवालदार मारूती कांबळे यांनी आपल्या सहकार्यासह या परिसरात सापळा रचला. त्यावेळी यशवंतराव चव्हाण चौक येथे एक इसम फिरत असल्याची खात्रीशिर माहिती प्राप्त झाल्यावरून त्यांनी मोठ्या शिताफिने त्या युवकास पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कमरेला गावठी कट्टा मिळून आला. तसेच गावठी बनावटीच्या पिस्टलसह चार जिवंत काडतुस अवैध रित्या मिळून आले. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेवून त्याच्या विरूद्ध भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविला. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील पोलिस हवालदार मारूती कांबळे, राजू पठाण, महेश जोगदंड, तुषार गायकवाड, गणेश मराडे यांचा समावेश होता.

अंबाजोगाई शहरात धाडसत्र सुरूचजिल्हा पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेतल्यापासुन बीड जिल्ह्यातील अवैध धंदे , अवैध वाहतुक अशा कारवाया सुरूच आहेत. अंबाजोगाईत गेल्या दोन दिवासांपासुन गुन्हे शाखा बीड येथील पथक कार्यरत आहे. गुरूवारी १८० वाहनांवर कारवाया केल्यानंतर शुक्रवारीही मोहिम सुरूच होती. शुक्रवारी या पथकाने अवैध व्यवसायांवर धाडी टाकण्यासोबतच गावठी कट्टा ही जप्त केला.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी