शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बीडमधील भुयारी गटार, पाणी पुरवठा योजनेचे काम तात्काळ मार्गी लावा; पालकमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 12:58 IST

लोकमत इम्पॅक्ट : शहरात अट्टल अमृत योजनेतंर्गत १६५ कोटी ८० लाख रूपयांची भुयारी गटार योजना राबविली जात आहे.

ठळक मुद्दे२४ महिन्यात ही योजना पुर्ण करणे अपेक्षित होते. १८ महिन्यात केवळ ३२ किमीचेच काम पूर्ण झाले आहे.

बीड : बीड शहरात पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम रखडले आहे. हीच बाब ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून निदर्शनास आणली. यावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरूवारी मुंबईत बैठक घेत दोन्ही योजनेचे काम तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले.

तसेच याचे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीही नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. रखडलेल्या कामावरून बीड पालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.बीड शहरात अट्टल अमृत योजनेतंर्गत १६५ कोटी ८० लाख रूपयांची भुयारी गटार योजना राबविली जात आहे. २४ महिन्यात ही योजना पुर्ण करणे अपेक्षित होते. परंतु १८ महिन्यात केवळ ३२ किमीचेच काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून या योजनेच्या कामावर नियंत्रण आहे. परंतु मजिप्रने पालिका जागा उपलब्ध करून देत नाही, असे कारण सांगितले आहे. तर पालिकेने जागा सोडून इतर कामे करण्यास मजिप्रला काय अडचण आहे? आमच्याकडून पाठपुरावा सुरूच आहे, असे सांगितले जात आहे. दोघांच्या टोलवाटोलवीमुळे शहरवासीयांमध्ये संताप आहे. 

पालिका व मजिप्र अभियंत्यांची बाजू घेऊन ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. यावर लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाले. गुरूवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईत बैठक घेतली. यावेळी आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम यांच्यासह मजिप्रचे सभप महाजन, नगरविकासचे पा.पो. जाधव, आर.एस.लोलापोड, पी.आर.नंदनवरे, व्ही.आर.बडे, एम.एच.पाटील, पालिकेचे अभियंता राहुल टाळके आदींची उपस्थिती होती. मुंडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची कानउघडणी करीत दोन्ही योजनांचे कामे तात्काळ मार्गी लावण्यासंदर्भात उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तसेच त्रिसदस्यीय समिती नियूक्त केली जाणार असल्याचे सांगितले. यामध्ये एक आमदार, नगरविकास व मजिप्रचे वरिष्ठ अधिकारी असणार आहेत. 

जागा उपलब्ध करून देणार - संदीप क्षीरसागरभुयारी गटार योजनेत मल निसारण केंद्र आणि पंपिंग स्टेशनला जागा नसल्याने काम रखडल्याचे मजिप्रकडून सांगण्यात आले आहे. आता ही जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे, आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे. तसेच विकास कामांत दिरंगाई करू नये. वेळप्रसंगी निधी कमी पडल्यास तो आम्ही आणू, असेही क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेfundsनिधी