शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरीत्या वाळूसाठा, वाहतूकदारांना जिल्हाधिकाऱ्यांची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:36 IST

अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गुरुवाजी जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक यांच्या समवेत इतर महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची बौठक घेतली, विशेष म्हणजे या बैठकीस हायवा चालक व कंत्राटदार हे देखील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गेवाराई तालुक्यातील राजापूर येथे कारवाई करुन २१०० ब्रासपेक्षा अधिक वाळू साठा जप्त करुन कारवाई केली होती. त्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांना मिळाली होती. त्याअनुषंगाने अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गुरुवाजी जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक यांच्या समवेत इतर महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची बौठक घेतली, विशेष म्हणजे या बैठकीस हायवा चालक व कंत्राटदार हे देखील उपस्थित होते.यावेळी बैठकीमध्ये जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सर्व महसूल व पोलीस अधिका-यांना वाळूच्या संदर्भात सूचना केल्या, तसेच ज्या क्षेत्रामध्ये अवैध वाळू साठा किंवा वाहतूक करताना कारवाई केली जाईल त्या ठिकाणच्या महसूल व पोलीस प्रशासनातील अधिका-यांची जबाबदारी ग्राह्य धरुन त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे वाळूच्या धंद्यामधून अर्थकारण करणा-या अधिका-यांचे धाबे दणाणले आहेत. तसेच वाळू तस्करी रोखण्यासाठी नेमून दिलेल्या अधिका-यांच्या पथकांकडून गस्ती घातल्या जातील. यावेळी जर कोणी वाहतूक व साठा सापडल्याचे समोर आले तर तात्काळ कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्वांनी सूचनांचे पालन करावे असे देखील जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले.पर्यावरणाचा -हास होत असल्यामुळे वाळू तस्करीसंदर्भात कायदे कढक आहेत. त्यामुळे अवैध वाळू वाहतूक करताना हायवा पकडा तर चालकाचे मोठ्या प्रमाणात नुसान होते. कारण कार्यवाही पूर्ण होईपर्यंत गाडीमध्ये वाळू भरलेली असल्यामुळे हायवाचे मोठ्या प्रमाणत नुकसान होते. त्यामुळे हायवा चालकांनी देखील अवैध वाळू वाहतूक करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी केले आहे. यावेळी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी देखील उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना अवैध वाळू वाहतूक आणि साठे रोखण्यासंदर्भात सूचना केल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, सर्व तहसीलदार व पोलीस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी वाळू वाहतूक करणारे हायवा चालक व कंत्राटदार यांना देखील जिल्हाधिकाºयांनी अवैध वाळू व्यवसाय न करण्यासंदर्भात सूचना दिल्या.उंदीर- मांजराचा खेळ सोडाअवैध वाळू वाहतूक करणारे हायवा चालक चोरी लपवण्यासाठी व कारवाईपासून वाचण्यासाठी मर्यादेक्षा अधिक स्पीडने हायवा पळवतात त्यामुळे अपघाताची शक्यता असते, तरी देखील प्रशासनातील अधिकारी त्यांचा पाठलाग करुन गाडी पकडतात, हा ‘उंदीर मांजराचा खेळ’ अवैध वाळू वाहतूकदारांनी सोडावा कारण प्रशासकीय अधिकारी व कर्मचाºयांना इतर देखील महत्त्वाची कामे असतात, असे देखील जिल्हाधिकारी म्हणाले.अंगरक्षकांची नियुक्तीज्या ठिकाणी वाळूपट्टा आहे, त्या ठिकाणच्या तहसीलदारांना माजी सैनिक अंगरक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच जिल्हा गौण खनिज अधिका-यासोबत ४ माजी सैनिकांचे पथक संरक्षणासाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे अवैध वाळू वाहतूक व तस्करांना आळा घालण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडBeed policeबीड पोलीस