शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राहायचं असेल तर मुंडेंसोबत, अन्यथा गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:24 IST

कोणी जर राज्यात भाजपासोबत व बीड जिल्ह्यात वेगळी भूमिका घेत असेल तर अशांनी आमच्यासोबत राहू नये. भारतीय जनता पार्टी गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. सोबत राहायचं असेल तर मुंडेंसोबत अन्यथा गरज नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबाजोगाईच्या सभेत आ. विनायक मेटेंचा समाचार घेतला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा मेटेंना सबुरीचा सल्ला : अंबाजोगाई येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर केली टीका; जातीधर्मावर नव्हे, तर विकासावर मत मागा

अंबाजोगाई : कोणी जर राज्यात भाजपासोबतबीड जिल्ह्यात वेगळी भूमिका घेत असेल तर अशांनी आमच्यासोबत राहू नये. भारतीय जनता पार्टी गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. सोबत राहायचं असेल तर मुंडेंसोबत अन्यथा गरज नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबाजोगाईच्या सभेत आ. विनायक मेटेंचा समाचार घेतला.बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईतील वंजारी वसतिगृहाच्या मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह नेते उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. ते म्हणाले, अपघातापेक्षा यू टर्न घेत जे निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतात त्या शरद पवारांना आता पक्षाकडे कोणतंच काम राहिले नसल्याने ही निवडणूक जातीकडे नेत आहेत. अशा भूलथापांना लोक थारा देत नाहीत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. जातीधर्माच्या नव्हे तर विकासावर मत मागा असा सल्लाही त्यांनी दिला. ज्यांना पंधरा वर्ष सत्तेत असूनही मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही. त्यांना आपण स्वत: आरक्षण दिले. बीड जिल्ह्यात १५ वर्षात केवळ ४०० कोटी रुपये आघाडी सरकारने दिले होते. तर माझ्या चार वर्षाच्या कार्यकाळत ३७०० कोटी रुपये देण्यात आले.मुख्यमंत्री म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखाली देश स्वाभिमानाने उभा आहे. आजपर्यंत ताठ कणा असणारा पंतप्रधान नव्हता. जशास तसे ठोस उत्तर देऊन पाकिस्तानला नमविण्याची कामगिरी त्यांनी केली. मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित असून सामान्य माणूस विकासाच्या प्रवाहात आल्याचा दावा त्यांनी केला. महाराष्ट्राच्या राजकारणाला गोपीनाथराव मुंडे यांनी नवी दिशा दिली. त्यांचा वारसा पंकजा व प्रीतम समर्थपणे चालवत आहेत. गोपीनाथरावाचं नाव लावण्याचा खरा अधिकार या दोघींनाच आहे. विनाकारण त्यांचं नाव लावण्यावरून राजकारण सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मराठवाडयाचा दुष्काळ कायमस्वरूपी दूर करण्यासाठी स्वतंत्र वॉटरग्रीड तयार करून गोदावरीचे समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला मिळवून देण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, अभिनय व भाषणे यांचे क्लासेस आमच्या भावाने घ्यावेत. एवढंच काम त्यांना आता शिल्लक आहे. धोकेबाजांसाठी जर आॅलिम्पिक स्पर्धा निघाली तर ते निश्चित पहिले येतील. ज्यांना काटा लावताना शेतकरी दिसत नाही त्यांना शेतकऱ्यांचा पुळका आल्याची टीका सोनवणे यांच्यावर केली.जयदत्त अण्णा तुम्ही तिकडे शोभून दिसत नव्हता - मुख्यमंत्रीजयदत्तअण्णा, तुमच्यासारखा माणूस तिकडे शोभून दिसत नव्हता. बिभीषणासारखी तुमची गत झाली होती. इकडे आलात आता कायमचे राहा, असा सल्ला त्यांनी क्षीरसागरांना दिला.मेटे, तुमची भूमिका बदला - रामदास आठवलेयावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, नरेंद्र मोदी हे पोलादी विकास पुरुष आहेत. त्यांच्या कार्यामुळे माझा पक्ष त्यांच्या सोबत आहे. समाजात फूट पाडण्याचे काम काही लोक करीत आहेत. संविधान बदलाचा विषय सोडून इतर विषयांवर टीका करा. मी भाजपसोबत असलो तरी कधीही संविधान बदलू देणार नाही.यावेळी रामदास आठवले म्हणाले की, विनायक मेटे हे माझे मित्र आहेत. ‘फडणवीस करणार तुम्हाला मोठे, मग असं का वागतात मेटे?’ जरी गेलात तरी परत या तुमची विधान परिषदेची व मंत्रिपदाची अपेक्षा भाजपाशिवाय पूर्ण होणार नाही. यासाठी त्यांनी आपली भूमिका बदलावी. अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली, तर आ. जयदत्त क्षीरसागर यांची व्यासपीठावरील उपस्थिती लक्षात घेत आठवले यांनी ‘जिन्होंने पलट दिया राष्ट्रवादी का पन्ना त्यांचं नाव आहे जयदत्तअण्णा’ अशी शीघ्र चारोळी सादर करीत श्रोत्यांचे मनोरंजन केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPankaja Mundeपंकजा मुंडेJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरVinayak Meteविनायक मेटे