शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

'...तर पुन्हा भाजपात जाऊ, शिंदे गटाचाही पर्याय'; आमदार प्रकाश सोळंके राष्ट्रवादीत अस्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 18:48 IST

गरज पडल्यास शिंदे गटात देखील प्रवेश शक्य, सद्यस्थितीत विविध पक्षाचे पर्याय खुल्ले असल्याचा आ. प्रकाश सोळंके यांनी सांगितले

माजलगाव ( बीड): मतदारसंघातील जनतेची इच्छा असेल तर भाजपातही जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. सत्ता बदलानंतर आ. सोळंके हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा मागील आठ महिन्यापासून सुरू आहे, यावर पत्रकार परिषदेत आ. सोळंके स्पष्टीकरण दिले. त्यांच्या अशा प्रकारच्या प्रतिक्रियेने राजकीय तर्कवितर्क सुरु आहेत. 

माजलगाव मतदार संघाचे आ. प्रकाश सोळंके हे दोन वेळा भाजपकडून तर दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेत पोहचले आहेत. तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीची सत्ता आली तेव्हा आ. सोळंके यांनी मंत्रीपदाची मागणी केली होती. मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची धमकी देखील दिली होती. दरम्यान, मागील राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर आ. सोळंके हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा वारंवार होत आहे. ते अनेक वेळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. 

येथील सुंदरराव सोळुंके महाविद्यालयात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत राष्ट्रवादीकडून 17 फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आ. सोळंके बोलत होते. ते यावेळी म्हणाले की, मी भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असल्याची मला अद्याप माहिती नसून जर जनतेची इच्छा असेल तर त्यांच्याशी चर्चा करून ते करावेही लागेल. परंतु भाजपाचे काही लोक याच्या वावड्या उठवतांना  दिसत आहेत.

बाळासाहेबांच्या सेनेवरही नजर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या चांगले काम सुरु असुन त्यांना बीड जिल्ह्यात मजबूत नेत्याची आवश्यकता आहे. त्यामुळे गरज पडल्यास त्यांच्या पक्षात देखील प्रवेश शक्य असून सद्यस्थितीत विविध पक्षाचे पर्याय खुल्ले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी तेलंगणा मधील केसीआर सरकारच्या चांगल्या कामाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीडPrakash Solankeप्रकाश सोळंकेBJPभाजपा