शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

'बेवारस असलो तरी माझा शेवट बेवारस नको';अखेर अंतिम इच्छा झाली पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 19:07 IST

ज्या निराधारांना कोणाचा आधार नाही. अशा अनेक निराधारांचे पालकत्व आजही मानवलोक ही संस्था खंबीरपणे सांभाळत आहे.

ठळक मुद्दे माणुसकी जिवंत आहे !

 - अविनाश मुडेगावकर 

अंबाजोगाई : मी जरी बेवारस असलो तरी माझा अंत्यविधी बेवारसपणे होऊ देऊ नका. माझा अंत्यविधी मानवलोकने करावा, अशी अखेरची इच्छा मारोती सीताराम कदम (वय ५५) यांनी आपल्या मृत्यूपूर्वी व्यक्त केली होती. ही त्यांची अखेरची इच्छा मानवलोकच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केली. ज्या निराधारांना कोणाचा आधार नाही. अशा अनेक निराधारांचे पालकत्व आजही मानवलोक ही संस्था खंबीरपणे सांभाळत आहे. 

येथील मारोती सिताराम कदम हे २५ वर्षांपूर्वी अंबाजोगाई शहरात राहयला आले. कुटुंब दुभंगल्याने ते अंबाजोगाईत कोठून आले याचा काहीही थांगपत्ता नव्हता. जोपर्यंत मनगटात बळ होते. तोपर्यंत ते मोलमजुरी करून स्वत:चा उदरनिर्वाह चालवत. मात्र तीन वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा आजार जडला. अन् ते पूर्णत: परावलंबी बनले. अशा निराधारांना अंबाजोगाई व परिसरात मानवलोक परिवाराचा आधार नित्याचा असतो. मानवलोकच्या जनसहयोग कार्यालयाने मारोती कदम यांची नोंदणी करून त्यांना मोफत राशन, निराधार योजनेची सवलत उपलब्ध करून दिली. त्यांचे औषधोपचारही मोफत केले. मात्र, या आजाराचा विळखा त्यांना जडल्याने आठवडाभरापूर्वी त्यांचे निधन झाले. मारोती कदम निराधार असल्याने त्यांचा अंत्यविधी करण्याची परवानगी पोलीस प्रशासनाच्या वतीने तात्काळ मिळेना. त्यांना निराधार घोषित केले. कोणीही नातेवाईक मागणी करत नसल्याने शेवटी त्यांचा मृतदेह विनंतीनुसार मानवलोककडे सोपविण्यात आला. मानवलोक जनसहयोगचे कार्यकर्ते शाम सरवदे यांनी मारोतीरावांचे पुत्र होऊन सर्व अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडले व मारोतीरावांची अखेरची इच्छा पूर्ण केली.  या अंत्यविधीसाठी मानवलोकच्या कार्यकर्त्यांसह सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अंबेकर, रमाकांत उडाणशिव, शेख मुख्तार, गंगाधर ढोणे, दिलीप मारवाळ, सतीश कांबळे यांच्यासह अनेकांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :BeedबीडSocialसामाजिकsocial workerसमाजसेवक