शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

माझे नुकसान होतेय, मला रुजू करून घ्या; बीड जिल्हा शल्यचिकित्सकाची मंत्रालयात धाव

By सोमनाथ खताळ | Updated: August 22, 2022 19:56 IST

नाशिकमधून कार्यमुक्त बीडमध्ये रुजू होता येत नसल्याने अडचण

- सोमनाथ खताळबीड : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सतीश सूर्यवंशी यांची बीडला जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून नियूक्ती झाली होती. परंतू अचानक त्यांना रूजू करून घेऊ नये, अशा सुचना संचालकांनी दिल्या होत्या. १५ दिवस झाले तरी त्यांना इतर ठिकाणी पदस्थापना अथवा बीडला रूजू करून घेतले नाही. अखेर डॉ.सूर्यवंशी यांनी सोमवारी प्रधान सचिवांची भेट घेत मला पदावर हजर करून घेण्याबाबत मागणी केली आहे. तसे लेखी पत्रही दिले आहे.

बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक पद मागील १३ महिन्यांपासून रिक्त होते. त्यामुळे माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश साबळे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. ५ ऑगस्ट रोजी डॉ.सूर्यवंशी यांची बीडला नियूक्ती झाली. दुसऱ्या दिवशी लगेच ते रूजू होण्यासाठी लातूरचे उपसंचालक कार्यालयात गेले. परंतू अचानक संचालक कार्यालयातून त्यांना रूजू करून घेऊ नये, असे पत्र प्राप्त झाले. पत्रात कसलेही कारण नमूद नव्हते. त्यामुळे डॉ.सूर्यवंशी यांना इतरत्र पदस्थापना देऊन डॉ.सूरेश साबळे यांची नियमित नियूक्ती होईल, अशी चर्चा होती. परंतू याला १५ दिवस उलटले तरी काहीच कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे डॉ.सूर्यवंशी हे नाशिकमधून कार्यमुक्त झालेले आहेत आणि इकडे पदस्थापना मिळालेली नाही. त्यामुळे इकडे ना तिकडे अशी गत डॉ.सूर्यवंशी यांची झाली होती. अखेर डॉ.सूर्यवंशी यांनी सोमवारी थेट मंंत्रालय गाठून प्रधान सचिवांची भेट घेतली. आपली व्यथा मांडत तात्काळ हजर करून घेण्याबाबत मागणी केली. याबाबत त्यांनी लेखी पत्रही दिले आहे. त्यामुळे यावर लवकर कारवाई होईल, अशी अपेक्षा वाटत आहे.

मी प्रधान सचिवांची भेट घेतली असून हजर करून घेण्याची मागणी केली आहे. याबाबत लेखी पत्रही दिले आहे. तिकडून रिलीव्ह झालो आणि इकडे जॉईन न झाल्याने माझे नुकसान होत आहे.- डॉ.सतीश सूर्यवंशी 

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड