लोकमत न्यूज नेटवर्कबीड : टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही सकाळीच घराबाहेर पडतोत. मालक लोक (नागरिक) कामासाठी घराबाहेर पडण्याआधीच आम्ही भिक्षुकी करून धान्य, पैसे आणि इतर पदार्थ जमा करतो. याच्यावरच आमचे पोट भरते. परंतु मागच्या काही दिवसांपासून आमच्या वेशभूषेकडे पाहून आम्हाला मुले पळविणारी टोळी समजून मारहाण केली जात आहे. या अफवा वाऱ्यासारख्या राज्यभर पसरल्या. त्यामुळे आता झोपडीबाहेर (घराबाहेर) पडायची सुद्धा भीती वाटत आहे. पायचं चौकटीबाहेर पडत नाही. झोपडीत बसलं तर उपाशी आणि बाहेर पडलं तर मरणाची भीती, अशी परिस्थिती आमच्यासमोर सध्या आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं कसं, असा सवाल प्रशासनाला उपस्थित करीत डबडबलेल्या डोळ्यांनी भटक्या समाजातील नागरिकांनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.
झोपडीत बसलं तर उपाशी; बाहेर पडलं तर मरणाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:29 IST
झोपडीत बसलं तर उपाशी आणि बाहेर पडलं तर मरणाची भीती, अशी परिस्थिती आमच्यासमोर सध्या आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं कसं, असा सवाल प्रशासनाला उपस्थित करीत डबडबलेल्या डोळ्यांनी भटक्या समाजातील नागरिकांनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.
झोपडीत बसलं तर उपाशी; बाहेर पडलं तर मरणाची भीती
ठळक मुद्देप्रशासनाला सवाल ! सांगा, जगायचं कसं ? : बीड जिल्ह्यातील भटक्या समाजातील नागरिकांमध्ये अफवांची भीती कायम