शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"अण्णांवर चिखलफेक कशी करु शकता"; वाल्मिक कराडविरोधातील गुन्हे मागे घेण्यासाठी महिलांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 14:32 IST

वाल्मिक कराडवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी बीडमध्ये उपोषण करण्यात येत आहे.

Valmik Karad :बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आल्याने राज्यातलं राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी अनेक आमदारांनी व इतर लोकप्रतिनिधिंनी लावून धरली आहे. मात्र अद्यापही वाल्मिक कराड हा फरार असून सीआडीकडून त्याचा शोध सुरु आहे. दुसरीकडे, वाल्मिक कराडवर झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी बीडमध्ये उपोषण करण्यात येत आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा दावा केला जात असून त्याच्या अटकेसाठी सीआयडीकडून शोध सुरु आहे. बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता वाल्मिक कराडच्या समर्थनात उपोषण करण्यात येत आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मयुरी विजयसिंह बांगर या उपोषण करत आहेत.

वाल्मिक कराडवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा दावा मयुरी विजयसिंह बांगर यांनी केला आहे. "राजकीय द्वेषातून हे आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावर जी चिखलफेक करण्यात येत आहे ती थांबवली पाहिजे. वाल्मिक कराड यांच्यावर असलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. आरोप खरे असतील तर त्यावर कारवाई केली जाईल. तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तुम्ही पुराव्याशिवाय अण्णांवर चिखलफेक कशी करु शकता. त्यांचा हा खरा चेहरा नाही. त्यांनी खूप समाजकार्य केले असून अनेक भगिनींचे कल्याण केले आहे. माझ्या सारखे अनेकजण त्यांच्यासाठी आवाज उठवू पाहत आहेत," असं उपोषणकर्त्या मयुरी विजयसिंह बांगर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर खंडणीसाठी गुन्हा दाखल पासून वाल्मिक कराड बेपत्ता आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय  मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे कराडचा कसून शोध घेतला जात आहे. अशातच कराड याचे शेवटचे लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये असल्याचे समोर आलं आहे. ११ डिसेंबर रोजी वाल्मिक कराड आपल्या सहकाऱ्यांसह मध्य प्रदेशमधील श्री क्षेत्र उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यानंतर त्याचा फोन बंद झाला.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस