शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीवरील अत्याचाराविरोधात माजलगावकर उतरले रस्त्यावर; आरोपीस फाशी देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 15:43 IST

माजलगाव शहर कडकडीत बंद; विद्यार्थी, महिलांचा मोर्चात मोठ्या प्रमाणावर समावेश 

माजलगाव ( बीड) : एका खाजगी विद्यालयातील शिक्षकाने साडेपाच वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना शहरात उघडकीस आली असून पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत हे प्रकरण चालून शिक्षकाला तात्काळ फाशी द्यावी, अशी मागणी करत संतप्त माजलगावकर आज सकाळी रस्त्यावर उतरले. माजलगाव शहर कडकडीत बंद ठेवून जुन्या शहरातील हनुमान चौक ते तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या भव्य मोर्चात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. 

शहराला लागून असलेल्या एका खाजगी विद्यालयात साडेपाच वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने ओळखल्यानंतर याच शाळेतील शिक्षक राहुल अंबादास वायखिंडे यास शनिवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीस चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. या प्रकरणानेमुळे माजलगावकरांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आहे. यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशी देण्यात यावी या मागणीसाठी आज माजलगाव बंदची हाक देण्यात आली होती. आज सकाळीपासूनच शहरातील व्यापाऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदवला. दरम्यान, जुन्या शहरातील हनुमान चौकातून तहसील कार्यालयावर नागरिकांनी भव्य मोर्चा काढला. येथील उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन यावेळी विद्यार्थ्यांच्या हाताने देण्यात आले. मोर्चात शहरातील अनेक शाळेमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना, व्यापारी, सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. 

संस्था चालकावर गुन्हा नोंदवाहा मोर्चा एवढा मोठा होता की , पहिली व्यक्ती तहसील कार्यालयात असताना शेवटची व्यक्ती हनुमान चौकात दिसून आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चा निघण्याची ही माजलगावच्या इतिहासातील पहिलीच वेळ दिसून आली. त्याचबरोबर माजलगाव शहर कडकडीत बंद असल्यामुळे कोठे पाणी देखील मिळणे मुश्किल झाले होते. यावेळी तहसीलदार संतोष रुईकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोर्चेकर्‍यांनी ज्या शाळेतील हा शिक्षक आहे त्या शाळेच्या संस्थाचालकांना सह आरोपी करून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावे अशी मागणी देखील करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडsexual harassmentलैंगिक छळEducation Sectorशिक्षण क्षेत्र