शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
3
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
4
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
5
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
6
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
7
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
8
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
9
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
11
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
12
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
13
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
14
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
15
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
16
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
17
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
18
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
19
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
20
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
Daily Top 2Weekly Top 5

एचआरसीटी स्कोअर १६, ऑक्सिजन लेव्हल ८८... केवळ बेड रिकामा करण्यासाठी दिला डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:37 IST

बीड : एचआरसीटी स्कोअर १६, ऑक्सिजन लेव्हल ८८ असतानाही तसेच उपचार बाकी असतानाही केवळ बेड रिकामा करण्यासाठी घाई गडबडीत ...

बीड : एचआरसीटी स्कोअर १६, ऑक्सिजन लेव्हल ८८ असतानाही तसेच उपचार बाकी असतानाही केवळ बेड रिकामा करण्यासाठी घाई गडबडीत एका रुग्णाला डिस्चार्ज देण्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयात झाला आहे. नातेवाईकांनी तक्रार करताच हा डिस्चार्ज रद्द करुन पुढील उपचार चालू ठेवण्यात आले. परंतु, या निमित्ताने जिल्हा रुग्णालयातील गलथान कारभार आणि जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांचे ढिसाळ नियोजन चव्हाट्यावर आले आहे.

वडवणी तालुक्यातील एक रुग्ण जिल्हा रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक ६ मध्ये १८ मे रोजी दाखल झाला. १९ तारखेपासून त्याला रेमडेसिविर इंजेक्शन व इतर उपचार सुरू करण्यात आले. आरोग्य विभागावर विश्वास ठेवून नातेवाईक बाहेर थांबले. परंतु, आतमध्ये ऑक्सिजन बंद पडले तरी नर्स व इतर कर्मचारी लक्ष देत नसल्याचे उघड झाले होते. यात दोन नर्सवर निलंबनाची कारवाईही झाली होती. त्यानंतर याच रुग्णाची २१ मे रोजी एचआरसीटी तपासणी केली असता स्कोअर १६ आला. तसेच ऑक्सिजन लेव्हल कमी जास्त होत होती. उपचारही सुरुच होते. असे असताना रविवारी रात्रीच्या सुमारास बेड रिकामा करायचा म्हणून याच रुग्णाला चक्क डिस्चार्ज देण्यात आला. नातेवाईकांनी हा प्रकार वरिष्ठांना सांगितल्यानंतर डॉ. अशोक हुबेकर यांनी धाव घेत हा डिस्चार्ज रद्द केला. हा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनाही कळविण्यात आला. त्यानंतर आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली.

९ वाजता इंजेक्शनचा पाचवा डोस

याच रुग्णाला साधारण ७ वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज झाल्याचे सांगण्यात आले. वास्तविक, याच रुग्णाचा रेमडेसिविर इंजेक्शनचा पाचवा डोस बाकी होता. तो डिस्चार्ज रद्द केल्यानंतर ९ वाजता देण्यात आला. ७ वाजताच रुग्णाला सुटी दिली असती तर या इंजेक्शनचा काळाबाजार झाल्याशिवाय राहिला नसता, असा संशय व्यक्त होत आहे.

सीएस, एसीएसचा निष्क्रिय कारभार

जिल्हा रुग्णालयात सुविधा आणि उपचाराविना रुग्णांचे हाल होत असल्याचे अनेक प्रकरणांवरून समोर आले आहे. असे असले तरी सीएस व एसीएसला काहीच देणेघेणे नसल्याचे दिसत आहे. रोज शेकडो तक्रारी प्राप्त होऊनही यात सुधारणा होत नसल्याचे दिसते. या दोन्ही निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे आता संताप व्यक्त होत असून, थेट मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.

कोणत्या डॉक्टरने डिस्चार्ज दिला, याची तपासणी केली जाईल. आता रुग्णाला डिस्चार्ज दिला जाणार नाही.

डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

===Photopath===

240521\24_2_bed_9_24052021_14.jpeg~240521\24_2_bed_7_24052021_14.jpeg

===Caption===

नातेवाईकांनी उपचार बाकी असल्याचे सांगताच वरिष्ठ अधिकाऱ्याने येऊन हे डिस्चार्ज रद्द केले.~तयार केलेले डिस्चार्ज कार्ड