शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सानुग्रह अनुदान मिळणार कसे? कोरोनाबळी असूनही दिले निगेटिव्हचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 13:35 IST

कोरोनाबाधित असताना मृत्यू झाल्यानंतरही मृत्यू प्रमाणपत्रावर सस्पेक्टेड व न्यूमोनिया अशी आजाराचे कारणे टाकण्यात आली आहेत. त्यामुळे हे प्रमाणपत्र सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी त्रासदायक ठरणार आहे.

बीड : कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive ) असल्याचे प्रमाणपत्र आणि रुग्णालयात मृत्यू होऊनदेखील मृत्यूप्रमाणपत्रावर कोरोना संशयित, न्यूमोनिया असल्याच आजार दाखवून मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले ( Negative Death Certificate Given Despite Corona Positive report) आहेत. हा सर्व प्रकार कोरोना काळात भरती झालेल्या कंत्राटी डॉक्टरांच्या दुर्लक्षाने झाल्याचे उघड झाले आहे. आता प्रमाणपत्र दुरुस्तीसाठी नातेवाईक जिल्हा रुग्णालयात खेटे मारत आहेत. आता मृत्यू प्रमाणपत्रावरच उल्लेख नसल्यास सानुग्रह अनुदान मिळणार कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.

कोरोनामुळे एखादी व्यक्ती मयत झाली तर त्यांच्या निकवर्तीय नातेवाइकांना ५० हजार रुपयांचे सानुग्राह अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती. याचा अधिकृत शासन निर्णय शुक्रवारी आला. याचा लाभ घेण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र आणि त्यावरील मृत्यूचे कारण हे दोन मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत; परंतु कोरोना महामारीत जिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काही डॉक्टरांची भरती करण्यात आली होती. काही डॉक्टरांचे काम कौतुकास्पद आहे; परंतु काहींनी ढिसाळ कारभार केल्याचे उघड झाले होते. असेच काही प्रकार आता समोर येऊ लागले आहेत. कोरोनाबाधित असताना मृत्यू झाल्यानंतरही मृत्यू प्रमाणपत्रावर सस्पेक्टेड व न्यूमोनिया अशी आजाराचे कारणे टाकण्यात आली आहेत. त्यामुळे हे प्रमाणपत्र सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. याच्या दुरुस्तीसाठी नातेवाईक दररोज जिल्हा रुग्णालयातील जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागात खेटे मारत आहेत; परंतु डॉक्टर येऊन प्रमाणपत्राची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आजही नातेवाइकांना मृत्यू प्रमाणपत्र मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत.

ही घ्या उदाहरणे :१ = मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील; परंतु सध्या बीडमध्ये नोकरी करत असलेल्या एका युवकाने आपल्या वडिलांना औरंगाबादहून बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. ते कोरोना पॉझिटिव्ह होते. याच रुग्णाची तपासणी जिल्हा शल्यचिकित्सक पदाच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी डॉ. सुरेश साबळे यांनी केली होती; परंतु त्यानंतर आठवड्यात या रुग्णाचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यावर त्यांना कोरोना सस्पेक्टेड असे लिहून प्रमाणपत्र दिले. त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार खेटे मारले. संबंधित महिला डॉक्टरला विनंती केली. तरीही दीड महिना काहीच झाले नाही. वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर यात दुरुस्ती झाली.

२ = वडवणी तालुक्यातील भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष उत्तरेश्वर खताळ व मोरवडचे सरपंच लंबाटे यांच्या ओळखीच्या महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यांच्या प्रमाणपत्रावर न्यूमोनिया असे लिहिण्यात आले. त्याच्या दुरुस्तीसाठी हे दोघे महिन्यापासून खेटे मारत आहेत. अद्यापही यात दुरुस्ती झालेली नाही. नातेवाइकांनी कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाणपत्रही दाखविले. तरीही केवळ डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने त्यांना हे प्रमाणपत्र मिळालेले नाही.

दुरुस्ती केली जाईल कोरोना पॉझिटिव्ह असताना मृत्यू झालेला असेल आणि कोरोना सस्पेक्टेड अथवा इतर आजार लिहिलेला असेल तर त्यात दुरुस्ती केली जाईल. नातेवाइकांनी पॉझिटिव्ह असलेले प्रमाणपत्र दाखवावे. संबंधित कंत्राटी डॉक्टर नाही आले, तरी एका तज्ज्ञ डॉक्टरकडून मृत्यू प्रमाणपत्र वितरित केले जाईल. नातेवाइकांनी मी अथवा एसीएस यांच्याकडे अर्ज करावा.-डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडDeathमृत्यू