शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'घराघरात भांडण लावणारे रडताहेत'; क्षीरसागरांचा पवार काका-पुतण्यांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 16:56 IST

आमच्या नियतीत खोट नसून आमची नियत साफ आहे.

ठळक मुद्देकरावे तसे भरावे केवळ प्रसिध्दी, बोर्डासाठी कधीही काम केले नाही. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी लगावला टोला.

बीड : आमच्या नियतीत खोट नसून आमची नियत साफ आहे. आम्ही कुणाचे वाईट केले नाही आणि भविष्यातही आमच्याकडून तसे होणार नाही. जसे कर्म तसे फळ मिळते. घराघरात भांडण लावणारे आज रडत आहेत, असा टोला  नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांना लगावला.

ते म्हणाले की, मागील अनेक निवडणुकात या भागातील नागरिकांनी आण्णांना पक्षीय भेद बाजूला सारून खंबीर साथ दिलेली आहे. आपण वॉचमन, ड्रायव्हर, नोकर कामावर ठेवतांना तीनदा विचार करतो, ही विधानसभेची निवडणूक आहे. आपला लोकप्रतिनिधी कोण असावा. त्याला विकासाची तळमळ आणि निर्णय घेण्याची क्षमता असावी.  आण्णांना विकासाची जाण असून स्व.काकूंच्या काळापासून सर्वाना सोबत घेवून माणूस आणि माणुसकी जोपासत विकास कामांना सदैव प्राधान्य देत आण्णांच्या माध्यमातून दारूल उलूम, इदगा कंपाऊड, बालेपीर कब्रस्थान कंपाऊंड भित, सांस्कृतिक सभागृहाची उभारणी करण्यात आली.

मोमीनपुरा भागात नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मैनुद्दीन भाई, राजु भाई, राजु राणा, माजेद कुरेशी, एकबाल भाई, कलाम, शाहरु ख भाई, शेख राजू, राजभाई आदींची प्रमुख उपस्थिती होती.    पुढे बोलतांना नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की विकास कामाच्या बळावर आम्ही मते मागत असून विरोधकांनी विकासाचे एक तरी काम केले का? हे त्यांनी दाखवून द्यावे. विकास कामे करण्यासाठी विकासाची दृष्टी असावी लागते ती केवळ ना.आण्णांकडे असून केंद्र आणि राज्य शासनाकडे सातत्याचा पाठपुरावा करून आण्णांनी शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी अमृत अटल पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजना, सांस्कृतिक संभागृह, अंतर्गत रस्ते यासह नागरी विकासाची कामे सर्वाना सोबत घेवून केलेली आहेत. आम्ही विकासाची अनेक कामे केली पण केवळ प्रसिध्दी, बोर्डासाठी कधीही काम केले नाही. मतदार संघाच्या विकासासाठी आणि भाईचारा, शहराच्या शांततेसाठी लोक आम्हाला विश्वासाने मतदान करीत आहेत, असे ते यावेळी म्हणाले. 

यावेळी बोलतांना राजु राणा म्हणाले की स्व.काकूंच्या काळापासून क्षीरसागर परिवाराने शांतता, विकास आणि भाईचारा जोपासला आहे. परिसराच्या विकासासाठी आण्णांच्या मागे ताकत उभी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी बोलतांना कलीम म्हणाले की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण सर्वानी आण्णांच्या मागे मोठी शक्ती उभी करण्याची आवश्यकता असून स्व.काकू व आण्णांनी मागील चाळीस वर्षापासून विकासाचे जाळे निर्माण केले आहे. आण्णा हे काम करणारे राज्य पातळीवरील नेतृत्व असून त्यांचा विजय कोणी ही रोखू शकत नाही. विरोधक विरोधासाठी विरोध करतात पण विकासाची जाण असलेल्या आण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

यावेळी बोलतांना राजुभाई नवले म्हणाले की मोमीनपुरा भागात शिवसेना सुरवातीला मी आणली, आपल्या उज्वल भविष्यासाठी धनुष्यबाणाला मतदान करा. याप्रंसगी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तर कार्यक्रमासाठी परिसरातील व्यापारी, नागरिक, युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडShiv SenaशिवसेनाBeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर