शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री देवराईत पुन्हा पालवी फुटण्याची आशा; आगीची झळ पोहोचलेल्या झाडांना पाण्याचे सलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 12:07 IST

दोन आठवड्यांत झाडे पूर्ववत होतील असा वनविभागाला विश्वास

बीड : शहरापासून जवळच असलेल्या पालवर येथील सह्याद्री-देवराई परिसरात शनिवारी दुपारी अचानक आग लागून मोठ्या प्रमाणावर गवत जळाले तर ३२० झाडांना झळ लागली. क्षतीग्रस्त झाडांना तीन टँकरद्वारे पाणी देत परिसर पुन्हा फुलविण्याचे प्रयत्न वन विभागाने सुरू केले असून दोन ते तीन आठवड्यात झाडे पूर्ववत चांगली होतील, असा आशावाद वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

शनिवारी दुपारी सह्याद्री देवराई परिसरात आग लागून गवत पेटले होते. ही बाब माथ्यावर काम करणारे वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच एअर ब्लोअर व अन्य पद्धतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. चार वर्षांत प्रथमच असा प्रकार घडल्याने सह्याद्री देवराईचे प्रमुख सयाजी शिंदे, अरविंद जगताप यांच्यासह पर्यावरणप्रेमींनी दु:ख व्यक्त केले. दरम्यान आगीमुळे उजाड झालेला परिसर तसेच क्षतीग्रस्त झाडांना पुन्हा फुलविण्यासाठी वन विभागाने रविवारपासून प्रयत्न सुरू केले आहेत. वनअधिकऱ्यांनी केलेल्या निरीक्षणातून ३२० झाडांना झळ पोहोचल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार परिसर व क्षतीग्रस्त झाडांना पाणी दिले जात असल्याचे सांगण्यात आले.

कठोर प्रतिबंधाची गरजमागील चार वर्षांपासून पालवण परिसरातील वन विभागाच्या २०७ हेक्टर क्षेत्रात सह्याद्री-देवराई परिसर फुलविण्यात येत आहे. परिसरात फिरायला, सहलीला, वाढदिवस साजरा करायला अनेक जण येथे येतात. मात्र, शनिवारी लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आता देखरेखीसाठी २४ तास कर्मचाऱ्याची नियुक्ती, तसेच येणाऱ्यांवर कठोर प्रतिबंध लावण्याची गरज आहे. नागरिकांनीही वनसंपत्तीचे जतन व संरक्षण करण्याबाबत सकारात्मक राहण्याची गरज असल्याचे बोलले जाते.

सह्याद्री देवराई परिसरात आगीच्या घटनेनंतर पाहणी करून क्षतीग्रस्त झाडे फुलविण्यासाठी वनविभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. जवळच असलेला तलाव तसेच डोकेवाडा तलाव आणि परिसरातील खासगी विहिरींवरून तीन टँकरने आणलेले पाणी कर्मचाऱ्यांमार्फत सह्याद्री देवराईतील परिसर व झाडांना दिले जात आहे. लवकरच परिसर पूर्ववत होईल. येथे रोज एक पहारेकरी व शनिवार आणि रविवारी दोन पहारेकरी नियुक्त केले जात आहेत.- अमाेल मुंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बीड.

टॅग्स :Beedबीडsayaji shindeसयाजी शिंदेenvironmentपर्यावरणforestजंगल