शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

इतिहासाची पुनरावृत्ती; आमदार सोळंकेंना शह देण्यासाठी डक यांचे प्यादे पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 15:14 IST

८० च्या दशकात माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांच्या विरोधात गोविंदराव डक यांना उभेकरून शरद पवार यांनी रात्री १२ वाजता ऐतिहासिक सभा घेतली होती

- सुधीर महाजन 

माजलगाव तालुक्यात इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. मुंबई बाजर समितीच्या सभापतीपदी अशोक डक निवडून आले, ही राष्ट्रवादीची अंतर्गत खेळी दिसते. आ. प्रकाश सोळंके यांना शह देण्यासाठी अजित पवारांनी हे प्यादे वापरले. ४० वर्षांपूर्वीही असेच घडले होते. प्रकाश सोळंकेंचे वडील सुंदरराव सोळुंके हे माजी मंत्री ते बीड जिल्हा परिषदेचे ६२ ते ६७ अध्यक्ष नंतर ६७ ते ७२ केज मतदारसंघात निवडून आले. ७२ ते ७७ गेवराई मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले. ७७ ते ८० माजलगाव मतदारसंघात निवडून आले.

वसंतदादा पाटील यांना धोका देत शरद पवार (पुलोद) सोबत येऊन उपमुख्यमंत्रीपद मिळवले. त्यांना उद्योग, बांधकाम, छपाई, दुग्धविकास यासह महत्त्वाची खाती मिळाली. १९८० राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर ते परत शरद पवार यांना सोडून काँग्रेसमध्ये गेले. सोळंके उपमुख्यमंत्री असताना गोविंदराव डकांना पंचायत समितीचे सभापती व्हायचे होते; परंतु सोळंके यांनी त्यांना सभापती केले नाही. त्यामुळे ते नाराज होते. शरद पवार यांनी डकांना घरी तिकीट पाठवून निवडणूक लढण्यास भाग पाडले व मतदानाच्या एक दिवसअगोदर पवार यांनी रात्री १२ वाजता ऐतिहासिक सभा घेतली. त्याचवेळी सोळंकेंचा पराभव निश्चित झाला. सोळंके हे साडेबारा वर्षांत साडेअकरा वर्षे वेगवेगळ्या पदांवर मंत्री राहिले. ते आपल्याला सोळंके पुढे अडथळा निर्माण करू शकतात म्हणून पवारांनी त्यांना पराभूत केले. १५० किलो वजनाच्या गोविंदराव डक यांना पाहायला मुंबईहून लोक येत होते. सोळंके त्यानंतर पराभवातून सावरलेच नाहीत व पुन्हा निवडणूक लढवली नाही.

२००९ साली प्रकाश सोळंके यांचा प्रचार करण्यामध्ये अग्रेसर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक डक व मोहन जगताप यांना निवडून आल्यानंतर प्रकाश सोळंकेंनी बाजूला केले. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक डक व मोहन जगताप यांनी पक्षात राहून सोळंकेंच्या विरोधात शरद पवार यांना सांगून प्रचार केला. 

अशोक डक अजित पवार यांचे विश्वासू १७ वर्षांपूर्वी अशोक डक यांनी भाजपकडून जि.प.मध्ये दोन वर्षांनंतर अजित पवारांकडे जाऊन जि.पमध्ये सत्तांतर केले. यावेळी गोपीनाथराव मुंडे यांना मोठा दणका दिला. तेव्हापासून अशोक डक हे अजित पवारांचे विश्वासू मानले जातात. २०१४ साली विरोधात प्रचार केल्यानंतर २०१५ साली माजलगाव बाजार समितीच्या निवडणुकीत केवळ  एकटेच निवडून आलेल्या डक यांना सभापती करा, असे सोळंके यांना सांगितल्यावर त्यांनी यावर विरोध दर्शविला. त्यावर पवारांनी २०१९ ची उमेदवारी आजच डकांची जाहीर करतो, असे म्हणताच डकांना सभापतीपद दिले होते.

टॅग्स :Prakash Solankeप्रकाश सोळंकेmajalgaon-acमाजलगांवNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार