शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

ऐतिहासिक निकाल! शिक्षक साजेद अली हत्या प्रकरण; गुजर खान गँगमधील १२ आरोपींना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 19:34 IST

या खटल्यात तिघे निर्दोष सुटले असून गँगमधील १८ पैकी १२ जणांना जन्मठेप तर आणखी दोघांना कारवासासह दंडाची शिक्षा

बीड : शहरातील सय्यद साजेद अली मिर अन्सार अली (वय ३८, रा. बालेपीर, बीड) या शिक्षकाचा भरदुपारी खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा निकाल शुक्रवारी लागला. यात गुजर खानसह त्याच्या गँगमधील १८ पैकी १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच दोघांना कारावास आणि दंड ठोठावला आहे, तर तिघांना निर्दोष मुक्त केले आहे. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश १ बीड तथा विशेष मोक्का न्या. एस. आर. पाटील यांनी हा निकाल दिला आहे. आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने, त्यदृष्टीने हा ऐतिहासिक निकाल समजला जात आहे.

सय्यद साजेद अली या शिक्षकाकडे गुजर खान गँगने खंडणी मागितली होती. ती न दिल्याने २०१३ साली साजेद यांच्यावर हल्ला करून त्यांचे पाय तोडण्यात आले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयात दाखल झालेली केस मागे घेत नसल्याच्या कारणातून १९ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी २:३० ते ३ वाजेच्या सुमारास साजेद अली यांचा खून करण्यात आला होता. त्यानंतर ही गँग फरार झाली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुजरसह १८ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी यातील १७ आरोपींना अटक केली. त्यांच्यावर मोक्काही लावण्यात आला होता. या प्रकरणात तत्कालीन पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यामध्ये कलम ३०२, १२०(ब), १४३, १४७, १४९, १९५ (अ), २०१, २१२, ३८५ भा.दं.वि. सहकलम ३(१)(i), ३(२), ३(४), ३(५) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधि. १९९९ सह कलम ३/२५, ४/२७ शस्त्र अधिनियम, सह कलम १३५ महाराष्ट्र पोलिस अधिनियम सह कलम ७ क्रिमिनल लॉ अमेंडमेन्ट ॲक्टप्रमाणे १४ जणांना दोषी ठरविण्यात आले आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. अजय श्री. तांदळे यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील ॲड. अजय दि. राख यांनी मार्गदर्शन व सर्व सहा. सरकारी वकील यांचे सहकार्य लाभले. पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक बी. बी. जायभाये, बी. बी. शिंदे, एस. बी. तरटे, जी. एम. परजणे, एन. डी. भोसले, एस. पी. वाघमारे यांनी काम पाहिले.

कोणाला काय शिक्षा?अन्वरखान ऊर्फ गुजरखान पिता मिर्झाखान (रा. बालेपीर, बीड), मुजीबखान मिर्झाखान पठाण, आवेज काझी, शेख इमरान ऊर्फ काला इमरान शेख रशीद, सय्यद नासेर सय्यद नूर, सय्यद शाहरुख सय्यद नूर, शेख उबेद शेख बाबू, शेख सर्फराज ऊर्फ सरूडॉन, शेख शहबाज शेख कलीम, शेख अमर शेख अकबर (रा. गुलशननगर, बीड), शेख बबर शेख युसूफ (रा. खासबाग, बीड), शेख मजहर ऊर्फ हाफमर्डर शेख रहीम (रा. बांगरनाला, भारतभूषणनगर, बीड), बबरखान गुलमहंमदखान पठाण (रा. नेकनूर, ता. जि. बीड), शेख वसीम शेख बुऱ्हानोद्दीन (रा. रोशनपुरा, बीड) यांना दोषी ठरविण्यात आले आहे. तर तिघांना निर्दोष साेडले आहे. इम्रान पठाण ऊर्फ चड्डा हा अद्यापही फरार आहे. यातच बबरखान पठाण याला पाच वर्षे कारवास आणि पाच लाख रुपये दंड तसेच शेख वसीम याला सहा महिने शिक्षा आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे. १२ आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय १२ पैकी सात जणांना कारावासासह प्रत्येकी पाच लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

यात ४४ साक्षीदार तपासले आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा निकाल आहे. एकाचवेळी १४ आरोपी दोषी आणि त्यातही १२ जणांना जन्मठेप होण्याची ही पहिलीच वेळ आहे. खुनासह मोक्का व इतर कलमान्वये ही शिक्षा सुनावली आहे. यात ४४ साक्षीदार तपासले होते.- ॲड. अजय तांदळे, सहायक सरकारी वकील, बीड

टॅग्स :BeedबीडCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी