शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

अहो आश्चर्य... चालकाविनाच धावली ‘शिवशाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 07:22 IST

अंंबेजोगाईतील घटना : बस प्रवेशद्वाराला धडकली, बसचे मोठे नुकसान

अंबाजोगाई (जि. बीड) : येथील राज्य परिवहन मंडळाच्या आगारात उभी शिवशाही बस अचानक सुरु झाली आणि उतारामुळे थेट प्रवेशद्वाराला जाऊन धडकली. या अपघातात एक चालक जखमी झाला असून बस आणि प्रवेशद्वाराचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, प्रवेशद्वाराला धडकून न थांबता बस बाहेर रस्त्यावर आली असती तर मोठा अनर्थ झाला असता.

एमएच ०६ बीडब्ल्यू ०६४६ ही शिवशाही बस वातानुकुलीत यंत्रणा बंद पडल्यामुळे मुंबईला पाठविली होती.गुरु वारी सकाळीच ही बस दुरु स्त होऊन आली आणि आगारात प्रवेशद्वारासमोर लावली होती. सायंकाळी साडेसहा वाजता ही बस अचानक सुरु झाली. उतारावर उभी असल्याने ती सरळ प्रवेशद्वारातून बाहेर मुख्य रस्त्याच्या दिशेने निघाली. परंतु, अंबाजोगाईकरांचे दैव बलवत्तर म्हणून ही बस प्रवेशद्वाराला धडकली आणि तिथेच थांबली. आगारासमोरचा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे. ही बस तशीच वेगात असती तर मुख्य रस्त्यावर गेली असती मोठी दुर्घटना घडली असती. बसचा वेग एवढा होता की, या अपघातात लोखंडी प्रवेशद्वार आणि भिंत दोन्ही जमीनदोस्त झाले. तर समोरची काच फुटून आणि पत्रा तुटल्यामुळे बसचे जवळपास २० हजाराचे नुकसान झाले आहे. दरम्यान, बसच्या धडकेत चालक ए. एच. मोरे हे किरकोळ जखमी झाले आहेत.

बस कशी सुरु झालीही बस हॅन्डब्रेक लावून उभी केलेली होती. बस आपोआप सुरु झाली कि कोणी केली याचा अद्याप उलगडा झाला नाही. बस आपोआप सुरु होऊ शकत नाही असे तंत्रज्ञांचे म्हणणे आहे. मग बसमध्ये जाऊन बस सुरु करून आणि हॅन्डब्रेक काढून ती रस्त्याच्या दिशेने जाऊ देण्यामागे कोणाचा काय उद्देश होता हे समोर येणे आवश्यक आहे. अनेकांचा जीव धोक्यात घालणारा तो व्यक्ती आगारातीलच आहे कि बाहेरचा याचा देखील शोध घेणे गरजेचे आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, मात्र उशिरापर्यंत त्यातील फुटेज मिळू शकले नव्हते.चौकशी सुरू आहेया घटनेची चौकशी सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून या घटनेसाठी जबाबदार व्यक्ती कोण हे समजू शकेल. हे फुटेज मी स्वत: मुंबई येथे घेऊन जाणार आहे. दोषीवर कारवाई करण्यात येईल.- शिवराज कराड, आगार प्रमुख, अंबाजोगाई.

टॅग्स :ShivshahiशिवशाहीBus DriverबसचालकBeedबीड