शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

'हे.. हे.. आमच्या देशाचे पंतप्रधान'; सुषमा अंधारेंनी व्हिडिओ दाखवत उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 12:56 IST

बीडमधील जाहीर सभेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाला चॅलेंज दिले.

मुंबई/बीड - शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे गेल्या दोन दिवसांपासून अधिकच चर्चेत आहेत. बीडमधील त्यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या कार्यक्रमाच्या नियोजनदरम्यान स्थानिक पदाधिकाऱ्यांचा झालेला वाद चर्चेत होता. त्या वादात सुषमा अंधारेंना मारहाण झाल्याचा दावा स्थानिक जिल्हाध्यक्षांनी केला होता. मात्र, सुषमा अंधारेंनी हा दावा फेटाळला. पण, या घटनेची राज्यभर चर्चा सुरू झाली. आता, येथील जाहीर सभेत बोलताना सुषमा अंधारेंनी भाजपवर कडाडून टीका केली. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फसवणूक केल्याचे म्हणत, त्यांचा एक व्हिडिओ दाखवला. त्यानंतर, त्यांची मिमिक्री करत खिल्लीही उडवली. 

बीडमधील जाहीर सभेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाला चॅलेंज दिले. तुम्ही फक्त मोदींचा फोटो लावून निवडून जिंकून दाखवा, मी राजकारण सोडून देईल, असे राऊत यांनी म्हटले. तर, सुषमा अंधारे यांनीही मोदींच्या एका भाषणाचा व्हिडिओ दाखवत त्यांची खिल्ली उडवली. मोदी हे एक गणित समजावून सांगत असल्याचं त्या व्हिडिओत दिसत आहे. मात्र, त्या व्हिडिओला मॉर्फ करण्यात आलं असून त्यातून त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.

हे.. हे... आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत, जे आम्हाला ज्ञान पाजळतात. जे लोकांना वेड्यात काढतात, जे रोज नव्या थापा सांगतात, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी मोदींची मिमिक्री करुन दाखवली. तसेच, कोणाच्या खात्यात १५ लाख रुपये आले का, कोणाला नोकरी मिळाली, रोजगार मिळाला का? असा सवालही अंधारे यांनी केला. तसेच, सुषमा अंधारे हेच तर प्रश्न महाप्रबोधन यात्रेत विचारत आहे, जे त्यांना खुपतात, असे म्हणत भाजपला लक्ष्य केलं.  

संजय राऊतांचंही भाजपला आव्हान

"आमचे विरोधक आम्हाला म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून तु्म्ही मते मागितलीत. असं अजिबात नाही. आमचे बाळासाहेब ठाकरे हे १ लाख मोदींवर भारी होते आणि आहेत. कर्नाटकात मोदींनी ३६ जाहीर सभा घेतल्या, २७ रोड शो केले, पण जिथे जिथे मोदींनी सभा घेतल्या त्या सर्व ठिकाणी भाजपाचा पराभव झाला. यावेळीही भाजपाने मोदींचे फोटो लावले होते, स्वत: मोदीही फिरले होते. मग पराभव का झाला? आता आमच्याकडून ४० 'मिंधे' गेले आहेत, त्यांनी मोदींचा फोटो लावून जिंकून येऊन दाखवावं, राजकारण सोडेन, पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे नाव सांगणार नाही", असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना बीडमधील सभेत दिले. 

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाBeedबीड