शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ह्रदयद्रावक... दोन महिन्याच्या बाळाला भेटण्यास येणाऱ्या पित्याचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 13:32 IST

पैठण बारामती रोडवरील पाथर्डी तालुक्यातील चितळवाडी येथील घटना

नितीन कांबळे 

कडा (बीड) - दोन महिन्यांच्या तान्हुल्या बाळाला भेटण्यासाठी  गावी येत  असताना पैठण बारामती रोडवरील पाथर्डी तालुक्यातील चितळवाडी फाट्यानजीक वळणावर दुचाकीचा ताबा सुटुन झालेल्या अपघातात पित्याचा  जागीच मुत्यु झाद्याची घटना शुक्रवारी रात्री घडली असल्याने मुलाची भेट आधुरीच राहिल्याचे दिसुन आले.    आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील  युवराज पोपट जगताप वय वर्ष ३४ हा  गेल्या अनेक वर्षांपासून शेवगांव तालुक्यातील भेंडा सहकारी साखर कारखान्यावर हमाली करायचा  त्यामुळे कुटुंबासह कारखान्यावर राहत होता. पत्नीला दिवस गेल्याने ती माहेरी गेली होती. बाळंत झाल्यानंतर माहेरहून  ती सासरी आल्यावर वडिल आपल्या दोन महिन्याच्या तान्हुल्याला भेटण्यासाठी शुक्रवारी गावाकडे  येत असताना पैठण बारामती रोडवरील पाथर्डी तालुक्यातील चितळवाडी  फाट्यानजीक एका वळणावर दुचाकी क्रमांक एम.एच १२,  डी.के.३५६६ वरील ताबा सुटुन पुलाच्या खाली जाऊन झालेल्या अपघातात त्याचा जागीच मुत्यु झाल्याची घटना रात्री ९ च्या दरम्यान घडली. मृतावर पाथर्डी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असुन अंत्यविधी दुपारच्या दरम्यान होईल.त्याच्या पाश्यात आई, वडिल, भाऊ, बहीण, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू