शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या वरातीत बेधुंद नाचून तरुण खाली बसला, घटाघटा पाणी पिले अन् तोच अखेरचा क्षण ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 13:20 IST

मित्राच्या वरातीत बेधुंद नाचलेल्या तरुणाचा हृदयविकाराने झाला मृत्यू

-  पुरूषोत्तम करवामाजलगाव (बीड): मित्राच्या लग्नात निघालेल्या मिरवणुकीत वाद्याच्या तालावर बेधुंद होऊन नाचल्यानंतर तरुणाचा हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री तालुक्यातील शिंदेवाडी येथे घडली. वैभव रामभाऊ राऊत ( २५ ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

रविवारी सायंकाळी शिंदेवाडी या गावात माने-कोळसे शुभविवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नात नवरा नवरी दोघेही शिंदे वाडी गावातील रहिवासी होते. लग्नातील नवरदेव अक्षय माने याच्या विवाह असल्याने त्याचे माजलगाव येथील मित्र लग्नास आले होते, त्यात वैभव रामभाऊ राऊत हा देखील होता. सायंकाळी सहा- साडेसहाच्या सुमारास  लग्नापूर्वी मारुतीला पाया पडण्यासाठी नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी सुरू असलेल्या वाद्यांच्या तालावर सर्व तरुण मंडळी बेधुंद नाचत होती. अगोदरच दिवसभर असलेला उन्हाचा पारा व त्यातच बेधुंद नाचणे बराच वेळ सुरू होते. 

मिरवणूक लग्नस्थळी येताच तेथे वैभव मित्रांसह खुर्चीवर बसला. तेथे बसून त्याने तहान लागल्याने घटाघट पाणी पिले. त्यानंतर लगेच हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने तो कोसळला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. मित्रांनी वैभवला लागलीच माजलगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. अचानक झालेल्या या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूmarriageलग्नBeedबीड