शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कष्टाचे चीज झाले; भंगार विकणाऱ्याचा मुलगा झाला आरटीओ अधिकारी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 16:21 IST

भंगार विक्रीच्या व्यवसायातून कुटुंब चालवत तिन्ही मुलांचे शिक्षण केले

- नितीन कांबळे  कडा (बीड): वडिलांनी 40 वर्ष भंगार विक्रीचा व्यवसाय करून मुलाचे शिक्षण केलं तर आईनी मंजूरी करून कुटुंबाचा गाडा चालवला. तीन मुलांची शिक्षण कसेबसे करून मोठ्या मुलाला दादासाहेब यास आरटीओ अधिकारी बनवण्याचा पराक्रम आष्टी तालुक्यातील चोभा निमगाव येथील भंगार विक्री करणाऱ्या सुदाम गाडे यांच्या कुटुंबांनी करून दाखवला आहे. अशाच या कुटुंबाची ही यशोगाथा.

आष्टी तालुक्यातील वटणवाडी निमगावच्या मध्यभागी असलेल्या झोपडपट्टी परिसरात राहणारे सुदाम गाडे यांचे पत्नी, तीन मुले असे पाच जणांचे कुटुंब आहे. गाडे मागील चाळीस वर्षापासून भंगार विक्रीचा व्यवसाय करत. यातूनच त्यांनी कुटुंब चालवत आपल्या तिन्ही मुलांचे शिक्षण केले. दादासाहेब गाडे यांनी पहीली ते दहावी कानिफनाथ विद्यालय निमगाव येथे केले तर महाविद्यालयीन शिक्षण श्रीराम जुनियर कॉलेज कडा तर मेकॅनिकल इंजिनिअरचे शिक्षण विखे-पाटील इंजीनियरिंग  कालेज  अहमदनगर येथे पूर्ण केले. तर पुढे काही दिवस नारायणगाव येथे एका कॉलेजवर प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. हे करत असतानाच विविध स्पर्धा परीक्षा देणे त्याने सुरूच ठेवले. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गतवर्षी घेतलेल्या परीक्षेचा निकाल काल परवा लागला. यात देशात 23 तर महाराष्ट्रात 66 तर एसटी प्रवर्गातून महाराष्ट्रामध्ये तिसरा येण्याचा मान दादासाहेब गाडे याने मिळवला आहे.

कष्टाची जाण ठेवली आईवडिलांनी केलेल्या कष्टाची जाण ठेवून अभ्यास केला. आई-वडील,  शिक्षकांनी मला घडवले. त्यामुळे हे शक्य झाले, अशा शब्दात दादासाहेब गाडे याने  मिळवलेल्या यशाबद्दल आष्टी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे 

वडील म्हणाले एक दिवस झेंडावंदनला कपडे घ्यायला पैसे नव्हते...एक दिवस असा होता की माझ्याकडे मुलांना कपडे घ्यायला सुद्धा पैसे नव्हते. पण बायको रातभर भाडल्याने सकाळी उठून बाहेर गेलो, मित्राच्या पाया पडून कसेबसे पैसे घेऊन दुकानातून कपडे आणले. त्यानंतर मुलं शाळेत गेले. यावेळी बोलताना सुदाम गडे यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. 

आई म्हणाली जीवनाचं सार्थक झालं..दादासाहेब याने स्वतः शेतामध्ये काम केलं, वडिलांनी भंगार विक्रीचा व्यवसाय केला तर भावांनी गवंड्याच्या हाताखाली काम करत कुटुंबाला हातभार लावला. मोलमजुरी करून मुलाला शिकवलेल्या कामाचं चीज झालं, इतका आनंद झालाय की, सांगता येत नाही, अशी प्रतिक्रिया आई संजानाबाई यांनी दिली.  

आमच्या गावाच  भूषण एका भंगार विक्री करणाऱ्या कामगाराचा मुलगा जर आरटीओ होत असेल तर दुसऱ्या युवकांनी सुद्धा आपण काहीतरी करायला पाहिजे, याचा एक आदर्श दादासाहेब गाडे यांनी आमच्या गावातील तरुणांसमोर निर्माण केला आहे. त्यामुळे सर्वांना दादासाहेबचा अभिमान वाटत आहे. तो आमच्या गावच भूषण आहे, असे माजी उपसरपंच विजय शेळके यांनी सांगितले. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसEducationशिक्षणBeedबीड