याप्रकरणी एक जणांविरुद्ध विनयभंग व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील ३० वर्षीय महिला ही अनुसूचित जातीची असल्याचे माहीत असताना आरोपी राजेंद्र नामदेव लांडगे याने या महिलेच्या मोबाईलवर सतत फोन करून माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणून त्रास दिला. ती घरी एकटीच असल्याची संधी साधून आरोपी राजेंद्र लांडगे याने तिच्या घरात घुसून वाईट हेतूने पीडितेच्या हाताला धरून शरीरसुखाची मागणी करत मनाला लज्जा वाटेल असे वर्तन केले. तिने विरोध करताच राजेंद्र लांडगे याने तुला काय करायचे आहे, ते कर. मी तुला बघून घेतो, अशी धमकी देऊन निघून गेला. अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून आरोपी राजेंद्र लांडगे याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसांत विनयभंग व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. केजचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, जमादार संजय राठोड हे पुढील तपास करत आहेत.