बीड : बीड जिल्हा वकील संघाच्या मंगळवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. दिनेश हंगे हे विजयी झाले तर सचिवपदी अॅड. अभिषेक जोशी यांनी बाजी मारली. या निवडणुकीत प्रथमच ‘वन बार वन वोट’चा अंमल करण्यात आला.बीड जिल्हा वकील संघाच्या कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार अॅड. रणजीत वाघमारे हे बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित सहा पदांसाठी १३ उमेदवार रिंगणात होते. अॅड. राजेश आर्सुळ यांचा पॅनल व अॅड. दिनेश हंगे यांचा एकता पॅनल निवडणूक रिंगणात होते.सचिवपद वगळता इतर पदांसाठी सरळ लढत झाल्याने चुरस निर्माण झाली होती. मंगळवारी संघाच्या सदस्य मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला हक्क बजावला. मतदानासाठी वकीलांमध्ये उत्साह दिसून आला. रांगा लावून मतदान पार पडले. ८०३ पैकी ७०४ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.जिल्हा सत्र न्यायालयातील जिल्हा वकील संघाच्या कार्यालयात मतदान पार पडले. मतदानानंतर सायंकाळी मतमोजणी करुन निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. बालाप्रसाद करवा यांनी निकाल जाहीर केला. त्यांना मतदान अधिकारी म्हणून त्यांना संजय राजपूत, नितीन वाघमारे, रमेश राऊत, शिवाजी उजगरे, सुधीर जाधव, अशोक हंगे, बालाप्रसाद सारडा, बाबासाहेब बहिरवाळ यांनी सहकार्य केले.एकूण ८५ मते झाली बादअध्यक्षपदासाठी दिनेश हंगे यांना ४३४ तर राजेंद्र आर्सूळ यांना २६३ मते मिळाली ७ मते बाद झाली. हंगे यांचा १७१ मतांनी विजय झाला. उपाध्यक्षपदासाठी रामेश्वर चाळक यांना ४२४ मते मिळाली. मोहतासीब यांना २५४ मते मिळाली २६ मते बाद झाली. यात चाळक विजयी झाले.सचिव पदासाठी अभिषेक जोशी यांना ४०९, श्रीकांत जाधव यांना १२२ तर रंजीत करांडे यांना १६३ मते मिळाली. २४६ मतांनी जोशी विजयी झाले १० मते बाद झाली.महिला प्रतिनिधी पदासाठी बबीता पळसेकर यांना ३२४ मते मिळाली तर संगिता भुतावळे यांना ३७० मते मिळाली. ४६ मतांनी भुतावळे विजयी झाल्या. १० मते बाद झाली.ग्रंथपाल सचिव पदासाठी कृष्णा नवले यांना ३२० तर धनराज जाधव यांना ३६३ मते मिळाली २१ मते बाद झाली जाधव ४३ मतांनी विजयी झाले. सहसचिव पदासाठी सय्यद यासेर यांना ३९७ तर किशोर कसबे यांना २९६ मते मिळाली ११ मते बाद झाली १०१ मतांनी यासेर पटेल विजयी झाले.
अध्यक्षपदी हंगे, सचिवपदी जोशी विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 00:27 IST
बीड जिल्हा वकील संघाच्या मंगळवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. दिनेश हंगे हे विजयी झाले तर सचिवपदी अॅड. अभिषेक जोशी यांनी बाजी मारली.
अध्यक्षपदी हंगे, सचिवपदी जोशी विजयी
ठळक मुद्देबीड जिल्हा वकील संघ निवडणूक : वन बार, वन वोटचा प्रभावी अंमल