शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

निकामी ब्रेकमुळे दीड लाखाचा भुर्दंड; जागीच भरपाई देत केली तडजोड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:29 IST

व-हाड घेऊन निघालेल्या खाजगी बसचे ब्रेक निकामी झाल्यानंतर बेफाम बसने सहा वाहनांचे तसेच दुकानातील साहित्याचे नुकसान केले. मात्र याप्रकरणी जागीच भरपाई देऊन खाजगी बसमालकाने दीड लाख रुपये वाटून मिटवामिटवी केली. त्यामुळे एकही वाहनधारक पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला नाही. खाजगी बस मालकाच्या या ‘तत्परते’मुळे वºहाडासाठी वापरलेल्या बसच्या फिटनेसबद्दल शंका उपस्थित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : व-हाड घेऊन निघालेल्या खाजगी बसचे ब्रेक निकामी झाल्यानंतर बेफाम बसने सहा वाहनांचे तसेच दुकानातील साहित्याचे नुकसान केले. मात्र याप्रकरणी जागीच भरपाई देऊन खाजगी बसमालकाने दीड लाख रुपये वाटून मिटवामिटवी केली. त्यामुळे एकही वाहनधारक पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला नाही. खाजगी बस मालकाच्या या ‘तत्परते’मुळे वºहाडासाठी वापरलेल्या बसच्या फिटनेसबद्दल शंका उपस्थित होत आहे.

बीडमध्ये सोमवारी दुपारी गांधीनगर भागातून वºहाडींना घेऊन एक खाजगी बस पेठ भागातील नाळवंडी नाका येथील वळणावर आल्यानंतर ब्रेक निकामी झाले. त्यामुळे ही बस अनियंत्रितपणे एक किलोमीटरपर्यंत धावली. परिसरातील लोक व तरुणांच्या सतर्कतेमुळे जीवित हानी टळली. परंतु या बसने सहा वाहनांना धडक दिल्याने नुकसान झाले. एकाची नवी आॅटोरिक्षा होती. तर एकाची काहीच कागदपत्रे नसलेली रिक्षा होती.

इतर वाहनधारकांकडे रीतसर कागदपत्रे होती. या घटनेनंतर अंबाजोगाई येथून बस मालक बीडमध्ये पोहोचला. अवघ्या अर्धा तासातच प्रत्येकाशी चर्चा करुन जागीच भरपाईची रक्कम त्याने वाटून बस मोकळी केली. त्यामुळे पोलिसांपर्यंत नुकसानीची तक्रार कोणीही दिली नाही. या तत्परतेमुळे बसच्या फिटनेसबद्दल शंका निर्माण होत आहे.

दुसरीकडे या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात मात्र कायदेशीर पूर्तता म्हणून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सय्यद समीर सय्यद वजीर यांनी दिलेल्या फिर्यादीत ट्रॅव्हल्स् (एमएच २३ डब्ल्यू २४२४) चा चालक बाळासाहेब मुळे (रा. गंगाखेड) याने त्याच्या ताब्यातील ट्रॅव्हल्स् बस भरधाव, हयगयी व निष्काळजीपणाने चालवत अब्दुल कदीर यांच्या घरास धडक देऊन ट्रॅव्हल्स्चे अंदाजे २ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान केल्याचे नमूद केले आहे.

दुर्घटनेबरोबरच नुकसानहीवºहाड अथवा प्रवासी वाहतुकीसाठी अशी वाहने वापरताना होणारा निष्काळजीपणा तसेच आरटीओ व पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष यामुळे सोमवारसारख्या घटना घडू शकतात. प्रवासी वाहतूक तसेच कार्यक्रमांसाठी खाजगी बसचा वापर करताना फिटनेसबद्दल खातरजमा करणे गरजेचे आहे. नसता दुर्घटनेबरोबरच इतर नुकसानीलाही सामोरे जावे लागते. बसच्या कागदपत्रांसह इतर बाबींची चौकशी पोलिसांनी केली की नाही याबद्दलही शंका व्यक्त होत आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातMarathwadaमराठवाडा