शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशातून आलेला 33 लाखांचा गुटखा परळीत बीड पोलिसांनी पकडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 15:10 IST

यावेळी अंधाराचा फायदा घेत पिकअप टेम्पो आणि माल उतरून घेणारे फरार झाले.

परळी (बीड) : मध्यप्रदेशातील इंदूरमधून परळीत विक्रीसाठी आलेला 33 लाख रुपये किंमतीचा सुगंधी पान मसाला व गुटखा पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री परळी- गंगाखेड रस्त्यावर केली. पोलिसांनी टेम्पोसह एकूण 51 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून हरियाणाचा रहिवासी असलेल्या चालकास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एकूण आठ जणांविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एका टेम्पोमध्ये ( एच आर 69 डी 2302)  राज्यात बंदी असलेला राजनिवास गुटख्याचा माल परळी - गंगाखेड रोडवर उतरवला जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या पथकाने गंगाखेड रोडवर मध्यरात्री सव्वाबारा वाजता छापा मारला. 

यावेळी अंधाराचा फायदा घेत पिकअप टेम्पो आणि माल उतरून घेणारे फरार झाले. दरम्यान, पोलिसांनी मध्यप्रदेशहून आलेल्या टेम्पोची तपासणी केली. यावेळी चालक साबेर सौंदाना सुन्नी  ( रा. सुनेडा तालुका पुनाना राज्य हरियाणा ) याने गुटखा आणि पानमसाला इंदूर येथून आणल्याचे सांगितले. पोलिसांना गुटख्याचे 69 मोठे पोते व सुगंधी तंबाखूचे 14 मोठे पोते असा एकूण 33 लाख 21 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल आढळून आला. गुटखा आणि टेम्पो असा एकूण 51 लाख 36 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

या प्रकरणी आठ आरोपी विरोधात सहाय्यक फौजदार मुकुंद शामराव ढाकणे यांचे फिर्यादी वरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आज पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक फौजदार मुकुंद ढाकणे, जमादार बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, बालाजी दराडे, दिलीप गीते, विकास चोपणे यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड