शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सराफा दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:48 IST

तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथे शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी सोन्याचे दुकान फोडून जवळपास १२ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांनी शक्कल लढवत सीसीटीव्ही स्टोरेज डिव्हाईसच पळवले आहे.

ठळक मुद्देसाक्षाळपिंप्री येथील घटना : १२ लाखांच्या दागिन्यासह चोरट्यांनी सीसीटीव्ही पळवला

बीड : तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथे शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी सोन्याचे दुकान फोडून जवळपास १२ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांनी शक्कल लढवत सीसीटीव्ही स्टोरेज डिव्हाईसच पळवले आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील साक्षाळ पिंप्री येथील मिथुन वसंत चिंतामणी यांचे सोन्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानापुढील गेट तोडून त्यानंतर शेटरचे कु लूप तोडले व चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम व सोने-चांदीचे दागिन्यांसह १२ लाख २७ हजार रुपायांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. परंतु चोरट्यांनी शक्कल लढवत सीसीटीव्हीचे व्हिडिओ रेकॉर्डर देखील चोरुन नेले आहे. या घटनेची माहिती मिळाताच उपविभागीय पोलीस अधीक्षक भास्कर सावंत, बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि. सुजीत बडे, दरोडा प्रतिबंधक पथकाचे कर्मचारी, श्वान पथकाने घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला. तसेच परिसरात पाहणी करुन चौकशी व पाहणी केली. दरम्यान श्वान पथक व परिसरातील इतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.चोºया वाढल्या : पोलीस प्रशासनास चोरट्यांचे आव्हानजिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, मागील अनेक दिवसांपासून चोºया व दरोड्याचे प्रमाण वाढले आहे.यासंदर्भात मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही, चोºयाचे प्रमाण वाढल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी व्यापारी- नागरिकांमधून होत आहे.सोन्याच्या दुकानात चोरी करुन चोरट्यांनी शक्कल लढवत सीसीटीव्ही व्हिडीओ रेकॉर्डर चोरुन नेले आहे. त्यामुळे चोरट्यांचा शोध हे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.पोलिसांना माहिती कळाल्यानंतर श्वानपथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्या माध्यमातून देखील चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत.

टॅग्स :BeedबीडtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी