अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळकांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:12 AM2021-08-02T04:12:53+5:302021-08-02T04:12:53+5:30

श्री बंकटस्वामी महाविद्यालयात संयुक्त कार्यक्रम बीड : येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ...

Greetings to Annabhau Sathe, Lokmanya Tilak | अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळकांना अभिवादन

अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळकांना अभिवादन

Next

श्री बंकटस्वामी महाविद्यालयात संयुक्त कार्यक्रम

बीड : येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विवेक मिरगणे, कार्यालयीन अधीक्षक एस.एन. भारती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.जे.डी. चव्हाण, डॉ.शंकर धांडे, कनिष्ठ महाविद्यालयचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.राजाभाऊ नागरगोजे व प्रा.रणजीत आखाडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

संस्कार विद्यालयात महामानवांना अभिवादन

बीड : येथील संस्कार प्रबोधिनी संचलित संस्कार विद्यालयामध्ये रविवारी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त या थोर महामानवांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक डी.के. जाधव यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील शिक्षकांनी कोविड नियमावलीचे पालन करून उपस्थित होते. यावेळी सुरेश गिरी, सुनील सोनवळकर, सतीश महाजन, डी.के. जोशी, जी.आर. कुलकर्णी, अरुण टेकाळे, श्याम गायकवाड, लिपिक सराफ, अमोल आगवान, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवक वर्ग आदींची उपस्थिती होती.

010821\01bed_13_01082021_14.jpg~010821\01bed_12_01082021_14.jpg~010821\01_2_bed_16_01082021_14.jpg

शाहू आयटीआय~बंकटस्वामी~संस्कार विद्यालय

Web Title: Greetings to Annabhau Sathe, Lokmanya Tilak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.