शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या सह्याद्री-देवराईत दोन एकरांतील गवताला आग; झाडे सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 16:26 IST

खोडसाळपणा की वणवा पेटला : पर्यटनासाठी कडक निर्बंधांची गरज

बीड : शहरापासून जवळच असलेल्या सह्याद्री-देवराई परिसरात शनिवारी दुपारी अचानक आग लागून मोठ्या प्रमाणावर गवत जळाले असून, उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने वणवा पेटला, की कोणी खोडसाळपणा केला, याचा शोध घ्यावा लागणार आहे. दरम्यान, झाडे सुरक्षित असून, दोन एकर परिसरातील गवत जळाल्याची पुष्टी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार सह्याद्री-देवराई परिसराच्या माथ्यावर वन कर्मचारी पाणी देत हाेते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास परिसरातील गवताने पेट घेतल्याचे दिसून आल्यानंतर आग शमविण्यासाठी धावपळ सुरू झाली. एअर ब्लोअर मशीन, तसेच झुडपे व तुऱ्हाट्या आणून आगीवर नियंत्रणाचा प्रयत्न झाला. दीड तासानंतर आग आटोक्यात आल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आगीचे कारण समजू शकले नाही. सह्याद्री-देवराई परिसरात आग लागल्याचे समजल्यानंतर वपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसराची पाहणी केली. दरम्यान, रविवारी परिसरात पाणी देण्याचे काम वन कर्मचाऱ्यांमार्फत सुरू होते.

दोन अंदाजपाऊसप्रमाण चांगले राहिल्याने गवत वाढले आहे. उन्हामुळे ते वाळत असल्याने वणवा पेटला असावा, असा एक अंदाज आहे, तर परिसरात फिरायला येणाऱ्यांकडून किंवा कोणी खोडसाळपणे, हेतुपुरस्सर हा प्रकार केला, हे तपासले जाणार आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल असून, वन अधिकारी तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.

जंगल वाचलेवेळीच एअर ब्लोअरचा वापर व कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आग नियंत्रणात आली. परिसरात जाळपट्टे तयार केल्याने आग पसरली नाही. खड्ड्यांवर गवत नसल्याने झाडांना झळ बसली नाही. झाडे सुरक्षित राहिली अन् जंगल वाचले. घटनास्थळ परिसर दोन वर्षांपूर्वी झालेल्या वृक्षसंमेलनात वड महाराजांच्या झाडापासून, तसेच घन वनापासून काही अंतरावरच होता.

सयाजी शिंदेंना चिंता, म्हणाले झाडांचे नुकसान झाले का

सिनेअभिनेता व सह्याद्री-देवराईचे प्रवर्तक सयाजी शिंदे यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांच्याशी संपर्क करून कशामुळे घटना घडली, झाडांचे नुकसान झाले का, याबाबत विचारणा केली. त्यावर खड्ड्यावर गवत नसल्याने झाडे सुरक्षित राहिल्याचे व दोन एकरातील गवत जळाल्याची माहिती मुंडे यांनी शिंदे यांना दिली. 

बीडचे वैभव जपण्याची गरजमागील चार वर्षांपासून पालवण परिसरातील वन विभागाच्या २०७ हेक्टर क्षेत्रात सयाजी शिंदे व सह्याद्री-देवराई परिवार आणि वन विभागाच्या सहकार्याने १ लाख ६४ हजार झाडे लावून हा परिसर फुलविण्याचा प्रयत्न पर्यावरणप्रेमींकडून सुरू आहे. या ठिकाणी प्रवेश करताना वन विभागाने सूचना फलक लावलेले आहेत. परिसरात फिरायला, सहलीला, वाढदिवस साजरा करायला अनेक जण येथे येतात. मात्र, शनिवारी लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आता देखरेखीसाठी २४ तास कर्मचाऱ्याची नियुक्ती, तसेच येणाऱ्यांवर कठोर प्रतिबंध लावण्याची गरज असून, नागरिकांनीही वनसंपत्तीचे जतन व संरक्षण करण्याबाबत सकारात्मक राहण्याची गरज आहे.

टॅग्स :Beedबीड