शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:09 IST

शासनाने काल काढलेला दुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक आहे. दुष्काळच्या बाबतीत कसलीही आर्थिक तरतूद न करता केवळ घोषणा करून जनतेची घोर फसवणूक करण्याचे काम फडणवीस सरकार करीत आहे. फडवणीस यांना सरकार चालवता येत नसल्याने ते रोज नवा निर्णय घेतात व पुन्हा रद्द करतात, असा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांची टीका : अंबाजोगाईत काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : शासनाने काल काढलेला दुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक आहे. दुष्काळच्या बाबतीत कसलीही आर्थिक तरतूद न करता केवळ घोषणा करून जनतेची घोर फसवणूक करण्याचे काम फडणवीस सरकार करीत आहे. फडवणीस यांना सरकार चालवता येत नसल्याने ते रोज नवा निर्णय घेतात व पुन्हा रद्द करतात, असा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.अंबाजोगाईत काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून अशोक चव्हाण बोलत होते.ते म्हणाले, राज्यावर दुष्काळाची छाया पसरलेली असतांना शासन केवळ घोषणाबाजी करत आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत गंभीर, मध्यम, अशी दुष्काळाची वर्गवारी कधीच अस्तित्वात नव्हती. ज्याला कामच करायचे नाही ते वर्गवारी करीत जनतेची दिशाभूल करू लागले आहेत. महाराष्ट्राचे मंत्री रात्री जाऊन मोबाईलच्या प्रकाशात दुष्काळाची पाहणी करून जनतेची टिंगल करू लागले आहेत. कर्जमाफीतही शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला हलविण्याचे काम जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून सुरू असल्याचे चव्हाण यांनी ठणकावून सांगितले.यावेळी माजी खा. रजनी पाटील, माजी मंत्री सुरेश नवले, प्रा. टी. पी. मुंडे, डॉ. अंजली घाडगे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक राजकिशोर मोदी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्संग मुंडे यांनी केले. अ‍ॅड. विष्णूपंत सोळंकी यांनी आभार मानले. या जनसंघर्ष यात्रेस महिला व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मेडीकल कॉलेजपासून निघालेली जनसंघर्ष यात्रा व मोटारसायकल रॅली शहरातून निघाली होती. या यात्रेचा समारोप वंजारी वसतिगृहाच्या मैदानावर भव्य सभेने झाला.भाजपा म्हणजे केवळ घोषणांचा कारखानाचव्हाण म्हणाले, अच्छे दिन कभी नहीं आते हे खुद्द गडकरी यांनीच मान्य केले आहे. सरकारमधील आमदार, मंत्रीही जनतेशी नीट वागत नाहीत. ‘बेटी बचाव’ चा नारा देणाºया या सामाजिक विषमता निर्माण करू व्होट बँक ताब्यात घेण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. आता राम मंदिराचा प्रश्न निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आला आहे. तर धर्माच्या नावावर अत्याचार करणारे सनातन,भिडे, एकबोटे यांच्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण या संदर्भात कसलाही ठोस निर्णय झाला नाही. पाण्यावरून आज जिल्ह्याजिल्ह्यात वाद निर्माण होत आहेत. शासनाने जीआरप्रमाणे पाणीवाटप करावे, पाणी पेटविण्याचे काम सरकारने करू नये, असे ते म्हणाले.पालकमंत्री अदृश्य, बॅटरीच्या उजेडात दुष्काळ पाहणीअशोक चव्हाण म्हणाले, राज्यात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असतांना राज्याच्या ग्रामविकास व जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या अमेरिकेत अदृश्य झाल्या आहेत. तर निलंगेकर दुष्काळाची पाहणी मोबाईल बॅटरीच्या उजेडात करू लागले आहेत. अशी जनतेची टिंगलटवाळी बंद करा.बीड लोकसभेसह विधानसभेच्या दोन जागा द्या- राजकिशोर मोदीकाँग्रेस व राकाँची आघाडी झाली तर बीड जिल्ह्यात लोकसभेची जागा व विधानसभेच्या दोन जागा काँग्रेस पक्षाला द्यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आपल्या प्रास्ताविकात केली. या मागणीला अशोक चव्हाणांनी दोनच नाही तर आणखी एक विधानसभेची जागा बीड जिल्ह्याला वाटाघाटीत मागण्यात येईल, असे जाहीर उत्तर दिले.वातावरण काँग्रेसमय होऊ लागले आहे - हर्षवर्धन पाटीलयेत्या काळामध्ये राज्यात परिवर्तन निश्चित असून वातावरण काँग्रेसमय होऊ लागले आहे. भाजप सरकारला शेतकºयांबद्दल कसलीही चिंता नसून, गेल्या साडेचार वर्षात शेतकरी संकटात लोटला गेला आहे. आगामी काळात बीड जिल्ह्यापासून बदलासाठी सुरुवात करा, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सभेसाठी उपस्थित समुदायाला केले.मोदी - शहा म्हणजे रंगा - बिल्लाची जोडी !आपल्या भाषणात बोलताना माजी खा. रजनी पाटील म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा ही रंगा-बिल्लाची जोडी आहे. लोकसभागृहातही ते जोडीनेच बसतात. त्यांच्या खासदारातही या दोघांची दहशत असल्याने त्यांचे खासदारही जनतेच्या प्रश्नावर तोंड उघडायला तयार नाहीत.

टॅग्स :Beedबीडcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण