शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गुंडाला गुंड, बंडाला बंड; कोणाला घाबरत नाही: पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 19:28 IST

लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर खूप जणांचे प्रेम वाढले. मंत्री झाले काय आणि नाही झाले काय, मला काही फरक पडत नाही.

पाटोदा (जि. बीड) : मी गुंडाला गुंड आहे आणि बंडाला बंड आहे. राजकारणात काम करणाऱ्या माणसाने धर्मात हस्तक्षेप करू नये आणि धर्मात काम करणाऱ्या माणसाने राजकारणात हस्तक्षेप करू नये. काही जणांना स्वतःचे स्वागत स्वतःच करून घ्यायची सवय असते,'' अशी टीका मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.

पाटोदा शहराजवळील श्रीक्षेत्र संत मीराबाई संस्थान येथील संत मीराबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त मीराबाई संस्थानावर अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. याची सांगता सोमवारी झाली. याप्रसंगी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर खूप जणांचे प्रेम वाढले. मंत्री झाले काय आणि नाही झाले काय, मला काही फरक पडत नाही. आधीच मला तुमचे प्रेम मिळते आहे. त्या प्रेमाच्या बदलात मी तुम्हाला विकास आणि न्याय देऊ शकते. बीड माझेच आहे. मला आता आष्टीत जास्त प्रेम करावे लागेल, कारण परळी राष्ट्रवादीकडे गेल्याने आष्टी भारतीय जनता पक्षाकडे आहे, असे म्हणत त्यांनी आष्टी मतदार संघावर अप्रत्यक्ष दावा केला. यावेळी व्यासपीठावर संत मीराबाई संस्थानच्या मठाधिपती महंत राधाताई महाराज यांच्यासह माजी आमदार, नेत्यांची उपस्थिती होती.

...तर घरच्या गादीवर बसेलजोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही, त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल. राजकारणात आणि धर्मकारणात एकमेकांशी नाते असलेच पाहिजे. राजकारणात काम करणाऱ्या माणसाने धर्मकारणात हस्तक्षेप करू नये, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

मी नवीन पक्ष का काढेल?दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. मी स्वतः मंत्री आहे. असे असताना मी नवीन पक्ष का काढेल? असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीड