लोकमतच्या रक्तदान शिबिराला गेवराईत चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:39 IST2021-07-14T04:39:21+5:302021-07-14T04:39:21+5:30

गेवराई : स्व.जवाहरलाल दर्डा उपाख्य यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात भव्य रक्तदान महायज्ञ सुरू असून त्यानिमित्त गेवराई येथे लोकमत परिवाराच्या वतीने ...

Good response to Lokmat's blood donation camp in Gevrai | लोकमतच्या रक्तदान शिबिराला गेवराईत चांगला प्रतिसाद

लोकमतच्या रक्तदान शिबिराला गेवराईत चांगला प्रतिसाद

गेवराई : स्व.जवाहरलाल दर्डा उपाख्य यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात भव्य रक्तदान महायज्ञ सुरू असून त्यानिमित्त गेवराई येथे लोकमत परिवाराच्या वतीने शहरातील पत्रकार भवन येथे १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.

या शिबिराच्या शुभारंभास प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सचिन खाडे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महादेव चिंचोळे, सपोनि संदीप काळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, संजय काळे, डाॅ.अनिल दाभाडे, मंगेश खरात, सखाराम शिंदे हे उपस्थित होते.

यावेळी झालेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरास गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेस तालुकाध्यक्ष अक्षय पवार, दत्ता दाभाडे, जयसिंग माने, अमित वैद्य, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शेख एजाज, वंचित बहुजन आघाडीचे पप्पू गायकवाड, आधार माणुसकी ग्रुपचे पोलीस रंजित पवार, गजानन ग्रुपचे संभाजी सोसे, अनिल सोसे, अभिजीत ठाकूर, गजानन चौकटे, सराफ संघटनेचे राजेश टाक, मनोज मैड यांचे सहकार्य लाभले.

मान्यवरांच्या शिबिरास भेटी

कार्यक्रमाला लोकमत औरंगाबाद आवृत्तीचे संपादक नंदकिशोर पाटील, जाहिरात व्यवस्थापक सुरज धाये, अप्पासाहेब कानगुडे, कालिदास काकडे, भाऊसाहेब माखले, अंबादास अवधुत, सरपंच युवराज जाधव, रिपाइं पॅर्थसचे धम्मपाल कांडेकर, सुभाष सुतार, कैलास हातगुले, भागवत जाधव, वशिष्ठ शिंदे, मनोज जैस्वाल, कृष्णा गोलांडे, अशोक वखरे, सतीश अवसरे, योगेश नागरे, गजानन संभाहरे, मच्छिंद्र गावडे, किरण बेदरे, रामनाथ बेदरे, विजय चव्हाण, अशोक घरत यांच्यासह अनेकांनी भेटी दिल्या. यावेळी जिल्हा रुग्णालय रक्तपिढीचे आर. एस खेडकर, विकास राऊत, दिलीप आवसरमल तसेच लोकमत पार्टनर म्हनून श्री ओम स्टीलतर्फे प्रशांत वाघमारे, विशाल जाधवर, अत्तार सुबानी हे होते.

130721\20210713_111706_14.jpg

Web Title: Good response to Lokmat's blood donation camp in Gevrai