शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'दावणीला चारा द्या'; चाऱ्यासाठी आक्रमक शेतकऱ्यांचा जनावरांसह रास्तारोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 16:01 IST

दोन तासांच्या रास्ता रोकोने महामार्गावरील वाहतूक ठप्प

ठळक मुद्दे दुष्काळाची दाहकता वाढू लागलीपश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या ऊसावर व पेंढीवरच चाऱ्याची मदार आहे.

अंबाजोगाई (बीड ) :  शेतकऱ्यांच्या दावणीला चारा उपलब्ध करून द्या. या मागणीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांनी अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील सायगाव येथे शेतकऱ्यांनी जनावरांसह रस्त्यावर उतरून बुधवारी सकाळी रास्तारोको आंदोलन केले. दोन तास झालेल्या या आंदोलनाने महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली होती. अंबाजोगाईचे नायब तहसीलदार गणेश सरोदे यांनी घटनास्थाळी जाऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. 

अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीचा खरीप व रब्बी हंगाम पावसाअभावी गेला. यावर्षीचाही खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. सलग दोन वर्षे पाऊस न झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. होता तो चारा सहा महिन्यापूर्वी संपला. आता पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या ऊसावर व पेंढीवरच चाऱ्याची मदार आहे. पाच हजार रुपये प्रतिटन दराने ऊस विकत घेऊन जनावरांना खाऊ घालावा लागत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असतांना अशा स्थितीत चारा विकत घेणे मोठ्या जिकीरीचे काम झाले आहे. अगोदरच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना विकत चारा घेणे परवडत नाही.  अशी भीषण स्थिती असतांनाही प्रशासनाच्या वतीने चाराछावण्या सुरू झाल्या नाहीत. चाराडेपोही उपलब्ध नाहीत. पिण्याच्या पाण्याची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सर्व जलस्त्रोत निकामी झाले आहेत. जनावरांना चाराही नाही आणि पाणीही नाही अशा स्थितीत पशुधन सांभाळायचे कसे?

या चिंतेने विवश झालेल्या बर्दापूर, सायगाव, सुगाव, नांदगाव, पोखरी, मुडेगाव, दैठणा, वाघाळा व परिसरातील विविध गावच्या शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी आपल्या जनावरांसह रस्तारोको आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दावणीला चारा उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली. सलग दोन तास झालेल्या या रास्तारोकोमुळे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली होती. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची माहिती उपलब्ध होताच नायब तहसीलदार गणेश सरोदे, मंडळ अधिकारी गोविंद जाधव यांनी घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले व या मागणीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले. या आंदोलनाच्या वेळी बर्दापूर पोलिस ठाण्याच्या वतीन महामार्गावर पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीagitationआंदोलन