शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

ही निवडणूक माझ्या अस्तित्वाची, एक संधी द्या - धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:09 AM

परळी : दोन वेळा लेकींना आशीर्वाद दिले, मतदारसंघाचा काय विकास झाला? हे आपणासही माहीत आहे. २४ वर्षे मी आपली ...

ठळक मुद्देदोन वेळा लेकींना संधी देऊनही परळी मतदार संघाचा विकास झाला नाही; मी मात्र २४ वर्षे विकासासाठी झटतोय

परळी : दोन वेळा लेकींना आशीर्वाद दिले, मतदारसंघाचा काय विकास झाला? हे आपणासही माहीत आहे. २४ वर्षे मी आपली सेवा करतो आहे, आता या लेकाला आशीर्वाद द्या. परळी मतदार संघात विकास आणून पाच वर्षात चेहरा मोहरा बदलेल. ही निवडणूक माझ्यासाठी अस्तित्त्वाची आहे. सत्तेत नसतानाही मी परळीसाठी, मतदारसंघासाठी झिजतोय. सत्तेत असताना तुमच्या लेकीनी परळीसाठी काय केले, असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे परळी शहरात जोरात स्वागत करण्यात आले. अजित पवार, खा.अमोल कोल्हे, धनंजय मुंडेंचे भव्य रॅलीने परळीत स्वागत करण्यात आले. यानिमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न पूर्ण पाच वर्षात पूर्ण झाले नाही, पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री असतानाही आमच्या ताईसाहेबांना माजलगाव धरणाचे पाणी परळीच्या नागापूर धरणात आणता आले नाही, परळीत एमआयडीसी करता आली नाही, ‘वैद्यनाथ कारखाना’ शेतकऱ्यांचे पैसे देत नाही. मी जनतेच्या सेवेसाठी २४ वर्षे राबतोय, १०० एकर जमीन विकली पण कोठे ही कमी पडलो नाही. तुम्ही दोन वेळा लेकींना संधी दिली आहे, यावेळी तुमच्या या लेकावर विश्वास टाकून संधी द्या, संपूर्ण महाराष्टÑात परळीची राजकीय ताकद वाढवून बारामतीसारखा विकास करवून दाखवेल, असे भावनिक आवाहन मुंडे यांनी यावेळी केले.अजित पवार म्हणाले की, राज्यात ४५ वर्षात जेवढी बेरोजगारी वाढली नाही, तेवढी या दळभद्री सरकारच्या काळात वाढली. राज्यात मंदी वाढली पण मुख्यमंत्री फडणवीस यावर मार्ग काढायला तयार नाहीत. उद्योजकाना काय अडचणी आहेत हे विचारीत नाहीत, मुख्यमंत्री हे दिशाभूल करीत आहेत. राज्य विकासाच्या बाबतीत देशात तीन नंबरवर आहेत, असे सांगत आहेत, हे खोटे आहे. मुलींवरील अत्याचारात नंबर तीनवर आहे. या सरकारच्या काळात सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता फडणवीससाहेब कोणावर ३०२ दाखल करायचा असा प्रश्न अजित पवार यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला. ही निवडणूक महाराष्ट्रची आहे , या सरकारने पाच वर्षात काय केले हे मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजे. आम्ही सत्तेवर आल्यास कर्ज माफी करू, शिक्षकासह इतर रिक्त पदे भरू, असे आश्वासनही पवार यांनी दिले. बीड जिल्ह्यात युती सरकारने एकही कारखाना आणला नाही. तसाच मराठवाड्यावरही अन्याय केला. परळी - बीड - अहमदनगर रेल्वे मार्गाचे कामही अतिशय धिम्या गतीने चालू आहे. मंत्र्यांचे साखर कारखाने शेतकºयांचे पैसे देत नाही. आमचे सरकार निवडून आणा. बीड जिल्ह्यात सहा आमदार निवडून आणा. या बीड जिल्ह्याला सत्तेत महत्त्वाचे पदे देऊ असे आश्वासनही अजित पवार यांनी यावेळी दिले.सांगली, कोल्हापूर, साताºयातील पुरास महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाजपाचे सरकार जबाबदार आहे. या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नव्हता. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आलमपट्टी धरणाचे दरवाजे वेळेवर उघडले नसल्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये भयावह अशी पूरस्थिती निर्माण झाली आणि या भागाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. लोक रस्त्यावर आले, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.शिवस्वराज्य रॅलीने परळीत स्वागतराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवनेरी येथुन सुरू केलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे २३ आॅगस्ट रोजी परळी शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. या यात्रेचा बीड जिल्ह्यात ३ दिवस मुक्काम राहणार आहे.शुक्र वारी सायंकाळी पाच वाजता परळी तालुक्यातील धर्मापूरी रोड येथून परळीत आगमन झाले. धर्मापूरी रोड येथून दुचाकी मोटार सायकल रॅलीने या शिवस्वराज्य यात्रेचे परळी शहरात स्वागत करण्यात आले. ही यात्रा अंबाजोगाईकडे शनिवारी सकाळी निघणार आहे.

टॅग्स :BeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसDhananjay Mundeधनंजय मुंडेAjit Pawarअजित पवार